लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कलावंतांच्या मनातील सुप्त कलरव जेव्हा अलहिदा आविष्कृत होतो, तेव्हा जन्माला आलेले शब्द, सुर अन् चित्र त्याच्या हृदयातील सोनेरी मुकुट ठरतात. कलेचा हाच प्रवास प्रख्यात कलावंत दाम्पत्यांनी आज येथे उलगडला.रंग, चित्र, शब्द, भाषा, सूर व संगीत यांच्या जाणिवा समृद्ध करणाऱ्या ‘टॉक टेल’च्या ‘संवाद’ या उपक्रमांतर्गत शनिवारी कवि प्रफुल्ल शिलेदार व गायिका साधना शिलेदार हे दाम्पत्य तर, प्रभाकर पाटील व मनिषा पाटील हे चित्रकार दाम्पत्य रसिकांसमक्ष आले होते. वनामतीच्या सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमात, मुलाखतकार अजेय गंपावार यांनी त्यांना बोलते केले आणि त्यांच्या कलाकृतीला चालना देणाऱ्या मेंदूचे रहस्य उलडण्याचे प्रयत्न केले.कॅनव्हॉसवर हाताने केली जाणारी कलाकृती कधीच अंतिम नसते. मनात सतत अंतर्द्वंद्व सुरू असते आणि त्यात सतत बदल घडत असतात. प्रत्येक वेळी संशोधन सुरूच असते आणि कुठेतरी ते चित्र साकारले जाते. मात्र, तेव्हाही माझी कलाकृती माझ्यासाठी पूर्ण झाली असेलच, असे नाही.प्रभाकर पाटील, प्रख्यात चित्रकारस्वत: कविता लिहिणे आणि दुसऱ्याच्या कवितेचा अनुवाद करणे, या दोन्ही प्रक्रिया मला सारखाच आनंद देणाºया. दोन्ही सृजनाचाच भाग. अनुवाद हा कविचा रियाज असतो. तर, रियाजानंतरची परीक्षा म्हणजे स्वकविता होय. मात्र, कविच्या प्रतिभेला समाजाकडून प्रोत्साहन मिळत नाही.प्रफुल्ल शिलेदार, प्रसिद्ध कविछोट्या गावांमध्ये कलेचा प्रचंड असा खजिना दडला आहे. अशाच गावांतून मला ४० बंदिशी सापडल्या. त्यातूनच,विदर्भातील लोकधुनांवर आधारित तीन राग तयारही करता आले. मात्र, घराणेशाहीला बगल देणाºया कुमार गंधर्वांकडे संगीताचे धडे गिरविण्याची इच्छा अपूर्णच राहीली.साधना शिलेदार, प्रसिद्ध शास्त्रीय गायिकाप्रभाकर यांच्यापेक्षा माझी चित्रकारितेची शैली वेगळी आहे. चित्रांचा आकार मनात एकदम उमटला की तो कॅनव्हासवर साकारला जातो. माझ्या चित्रात बालपणीचे अनुभव, तो काळ, स्थळ, राहणीमान उतरत असतात. आम्ही दोघांनी मिळूनही काही चित्र साकारले आहेत.मनिषा पाटील, प्रख्यात चित्रकार
उलगडले रहस्य शब्द-सुरांचे अन् चित्रकारितेतील गांभीर्य-अल्लडतेचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2019 12:43 AM
कलावंतांच्या मनातील सुप्त कलरव जेव्हा अलहिदा आविष्कृत होतो, तेव्हा जन्माला आलेले शब्द, सुर अन् चित्र त्याच्या हृदयातील सोनेरी मुकुट ठरतात. कलेचा हाच प्रवास प्रख्यात कलावंत दाम्पत्यांनी आज येथे उलगडला.
ठळक मुद्दे‘टॉक टेल’ अंतर्गत शिलेदार आणि पाटील दाम्पत्याने साधला संवाद