लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील नागनदी प्रदूषणमुक्त करून तिचे स्वरुप पूर्णपणे बदलविण्यासाठी केंद्र शासनाने प्रस्ताव तयार केला आहे. या प्रकल्पाला गती देण्यासाठी केंद्रीय रस्ते व वाहतूक, महामार्ग व जलसंपदा नदी विकास, मंत्री नितीन गडकरी यांच्या समवेत नवी दिल्ली येथे २३ आॅगस्टला जपानच्या जायका (जपान इंटरनॅशनल कॉर्पोरेशन एजन्सी) कंपनी सोबत नागनदीच्या प्रकल्पाची सविस्तर चर्चा करण्यात आली होती. सदर प्रकल्पाला जपानकडून कर्ज देण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता. जपान सरकारने या प्रकल्पास मंजुरी दिली आहे. बुधवारी या आशयाचा ई-मेल जायका कंपनीकडून प्राप्त झाला आहे.यामध्ये जपानच्या सरकारने जायकाद्वारे सादर केलेल्या प्रस्तावाला हिरवी झेंडी दाखवली आहे, असे या ई-मेलमध्ये म्हटले आहे.नागनदी शुद्धीकरण प्रकल्पाचा एकूण खर्च १२५२. ३३ कोटी रुपये असून ८५ टक्के कर्ज १०६४.४८ कोटी रुपये जपान सरकार उपलब्ध करून देणार आहे तर प्रकल्पाच्या १५ टक्के निधीसाठी १८७.८४ कोटी रुपये इतकी रक्कम महानगरपालिका गुंतवणार आहे.नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष प्रयत्नातून शहराच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने सुरु असलेल्या प्रयत्नांमध्ये या प्रकल्पाचा मोलाचा वाटा असणार आहे. जपान सरकारने यासंदर्भात घेतलेल्या पुढाकाराने नागनदी शुद्धीकरण प्रकल्पास गती मिळणार आहे. लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. या प्रकल्पांतर्गत नागनदी सोबतच पिवळी नदी आणि बोर नाला शुद्धीकरणाचाही समावेश करण्यात आला आहे.कामाला लवकरच सुरुवातमहापालिकेने नागनदी सौंदर्यीकरण प्रकल्पाच्या कामाला लवकरच सुरुवात करण्याची तयारी केली आहे. यासाठी नदी पात्राच्या दोन्ही बाजुच्या १५ मीटर क्षेत्रातील घरे, दुकाने व प्रतिष्ठान हटविण्यात येणार आहे. महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम १९६६ च्या क लम ३७ अंतर्गत या प्रकल्पासाठी जागा अधिग्रहित करण्याचा प्रस्ताव ५ सप्टेंबरच्या सर्वसाधारण सभेत आणला जाणार आहे. शहरातील नागनदीची लांबी १६.७३२ किलोमीटर आहे. या भागाचे सौंदर्यीकरण केले जाणार आहे.
नागनदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्पाला हिरवी झेंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 9:22 PM
शहरातील नागनदी प्रदूषणमुक्त करून तिचे स्वरुप पूर्णपणे बदलविण्यासाठी केंद्र शासनाने प्रस्ताव तयार केला आहे. या प्रकल्पाला गती देण्यासाठी केंद्रीय रस्ते व वाहतूक, महामार्ग व जलसंपदा नदी विकास, मंत्री नितीन गडकरी यांच्या समवेत नवी दिल्ली येथे २३ आॅगस्टला जपानच्या जायका (जपान इंटरनॅशनल कॉर्पोरेशन एजन्सी) कंपनी सोबत नागनदीच्या प्रकल्पाची सविस्तर चर्चा करण्यात आली होती. सदर प्रकल्पाला जपानकडून कर्ज देण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता. जपान सरकारने या प्रकल्पास मंजुरी दिली आहे. बुधवारी या आशयाचा ई-मेल जायका कंपनीकडून प्राप्त झाला आहे.
ठळक मुद्देजपानकडून मिळणार १०६४.४८ कोटींचे कर्ज : मनपा १८७.८४ कोटींचा वाटा उचलणार