लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर हे ऐतिहासिक शहर आहे. शहरातील अनेक ऐतिहासिक वास्तू आजही त्याची साक्ष देतात. शहरामधून वाहणारी नागनदी ही सुद्धा याचाच एक भाग आहे. मात्र या नदीची आजची अवस्था पाहून वाईट वाटते. नदीच्या संवर्धनासाठी एएफडीने दिलेल्या मदतीच्या हातामुळे नागनदीचे पुनरुज्जीवन होईल, असा विश्वास अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे यांनी मंगळवारी व्यक्त केला.नागनदी पुनरुज्जीवन प्रकल्पासंदर्भात आयोजित दोन दिवसीय कार्यशाळेचे वनामती येथे रवींद्र ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी एएफडी फ्रान्सचे गॉटीएर कोहलेर, एएफडी दिल्लीच्या व्हॅलेन्टाईन लेनफन्ट, सिबीला जान्सिक , पी.के. दास असोसिएशनचे समर्थ दास, मिसाका हेत्तीयारच्ची, प्रियंका जैन, ब्लेंझ वारलेट, उपायुक्त राजेश मोहिते, तांत्रिक सल्लागार (नद्या व सरोवरे) मोहम्मद इस्राइल, नागपूर स्मार्ट अॅण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉपोर्रेशन लि.चे मुख्य महाव्यवस्थापक राजेश दुफारे, प्रमुख अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके आदी उपस्थित होते.एएफडी फ्रान्सने माझी मेट्रोच्या माध्यमातून नागपूरच्या विकासाला सहकार्य केले आहे. आता नागनदीच्या पुनरूज्जीवनासाठी पुढाकार घेतल्याने आपल्याला नव्या रूपात पाहता येणार आहे. आजच्या घडीला नागपूर शहर विकासाच्या बाबतीत जगातील पहिल्या २० शहरांमध्ये आहे. यासाठी हाती घेतलेला हा उपक्रम नागपूरकरांसाठी महत्त्वाचा ठरणार असल्याचे रवींद्र ठाकरे म्हणाले.अधिकाऱ्यांचा सहभागशहरातील विविध भागामधून वाहत जाणाऱ्या नागनदीच्या पुनरुज्जीवनासंदर्भात मत मांडण्यासाठी प्रत्यक्ष सहभागाद्वारे चर्चा करण्यात आली. कार्यशाळेमध्ये सहभागी अधिकारी व कर्मचाऱ्यांची तीन गटात विभागणी करण्यात आली. नागनदी वाहत असलेल्या सीताबर्डी, प्रजापती नगर व अंबाझरी परिसर हे तीन भाग तीन गटात विभाजित करण्यात आले. यावर नागनदीच्या पुनरुज्जीवनासाठी संकल्पना, सूचना मागविण्यात आल्या व त्यावर चर्चा करण्यात आली. नदी प्रदूषित होण्यामागील कारणे, त्यावरील उपाय, प्रदूषित करणारे घटक, त्यांचा मानवी जीवन व नदीवर पडणारा प्रभाव याबाबतही विस्तृत चर्चा यावेळी करण्यात आली. सदर कार्यशाळा दोन दिवस चालणार असून विषयाशी संबंधित सादरीकरण करण्यात येणार आहे.
एएफडीच्या सहकार्याने नागनदीचे पुनरुज्जीवन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 9:36 PM
नागपूर हे ऐतिहासिक शहर आहे. शहरातील अनेक ऐतिहासिक वास्तू आजही त्याची साक्ष देतात. शहरामधून वाहणारी नागनदी ही सुद्धा याचाच एक भाग आहे. मात्र या नदीची आजची अवस्था पाहून वाईट वाटते. नदीच्या संवर्धनासाठी एएफडीने दिलेल्या मदतीच्या हातामुळे नागनदीचे पुनरुज्जीवन होईल, असा विश्वास अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे यांनी मंगळवारी व्यक्त केला.
ठळक मुद्देअतिरिक्त आयुक्त : नागनदी प्रकल्पावर कार्यशाळा