शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
2
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
3
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
4
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
5
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
6
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
7
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
8
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
9
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
10
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

नागनदी पुनरुज्जीवनात झोपडपट्ट्यांचा अडथळा!

By admin | Published: June 03, 2016 3:01 AM

नागपूर शहराचा ऐतिहासिक वारसा असलेल्या नागनदीला गतवैभव प्राप्त व्हावे, सिवरेज व सांडपाण्यामुळे प्रदूषित झालेली ही नदी स्वच्छ व्हावी, ..

पुनर्वसनाची गरज : मोकळ्या जागा व क्रीडांगणावर अतिक्रमणगणेश हूड  नागपूर नागपूर शहराचा ऐतिहासिक वारसा असलेल्या नागनदीला गतवैभव प्राप्त व्हावे, सिवरेज व सांडपाण्यामुळे प्रदूषित झालेली ही नदी स्वच्छ व्हावी, यासाठी स्मार्ट सिटी योजनेंतर्गत एक हजार कोटींचा पुनरुज्जीवन प्रकल्प प्रस्तावित आहे. परंतु या नदीच्या किनाऱ्यावर वसलेल्या २९ झोपडपट्ट्यांमुळे यात अडथळा निर्माण झाला आहे.यातील २२ झोपडपट्ट्या १९७१ ते १९९२ सालात वसलेल्या आहेत. कायद्याने या झोपडपट्ट्यांना संरक्षण प्राप्त आहे. सात झोपडपट्ट्या १९९२ सालानतंरच्या वसलेल्या आहे. त्यामुळे या झोपड्यांनाही हटविणे शक्य नाही. नागनदीचा गुजरातमधील साबरमती नदीच्या धर्तीवर विकास करण्याचे प्रस्तावित आहे. परंतु नदी किनाऱ्यावरील सार्वजनिक वापराच्या जागा, क्रीडांगण व निवासी वापरासाठी आरक्षित असलेल्या जागावर या झोपडपट्ट्या वसलेल्या आहेत.नागनदीचे पुनरुज्जीवन करताना नदीपात्रात सोडण्यात येणारे सिवरेज, सांडपाणी सोडणे बंद करणे आवश्यक आहे. तसेच नदी पात्रात कचरा टाकण्याचा प्रकार थांबला पाहिजे. २९ झोपडट्ट्यात ९७१८ घरे असून येथील लोकसंख्या ५५२१० इतकी आहे. पुनरुज्जीवन प्रकल्प राबविताना नदीच्या दोन्ही बाजूचे पात्र मोकळे असणे आवश्यक आहे. यासाठी झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन करावे लागणार आहे. परंतु झोपडपट्ट्यांची संख्या विचारात घेता हे काम अवघड आहे. नदी किनाऱ्यावर वसलेल्या झोपडपट्ट्यांना कायद्याने संरक्षण मिळाले असल्याने त्यांना उठविता येणार नाही. नदीची शहरातील लांबी १७ किलोमीटर आहे. प्रवाह शुद्ध करण्यासाठी नदीच्या दोन्ही काठावर सिवरेज लाईन टाकून त्यावर ठिकठिकाणी छोटे-छोटे मलनिस्सारण प्रकल्प उभारणे, नदीला संरक्षक भिंत, आवश्यक असलेल्या ठिकाणी रस्ते, हिरवळ व वृक्षारोपण आदी विकास कामांचा नागनदी विकास आराखड्यात समावेश आहे. यासाठी झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन करून नदीपात्र व नदीकाठा लगतचा भाग मोकळा करावा लागणार आहे.