सुमेध वाघमारेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होऊ लागला आहे. यात लहान मुलांचीही संख्या वाढत असल्याने वैद्यकीय क्षेत्रात चिंतेचे वातावरण आहे. सध्याच्या स्थितीत नागपुरात ३७१ रुग्ण पॉझिटिव्ह असून यात १५ वर्षांखालील ५० रुग्ण आहेत. एकूण रुग्णांच्या १३.५१ टक्के रुग्ण हे लहान मुले आहेत. यात शुन्य ते एक वर्षापर्यंतची दोन, एक ते पाच वर्षांपर्यंतची आठ तर सहा ते १५ वर्षांपर्यंतची ४० रुग्ण आहेत. लहान मुलांना कोरोना विषाणूचा धोका नसल्याचे बोलले जाते. यामुळे काळजी करण्यासारखे नसल्याचा काहींचा गैरसमज आहे. तज्ज्ञाच्या मते, लहान मुलांमुळे ‘कोव्हिड-१९’ चा संसर्ग होऊ शकतो हे लक्षात ठेवायला हवे. नागपुरात नव्या कोरोना व्हायरसची लागण होणाऱ्या रुग्णांचे सरासरी वय ३१ ते ५० यामध्ये आहे. त्यातुलनेत लहान मुलांना याची लागण होण्याचे प्रकरण कमी आहे. सध्या लागण झालेल्या लहान मुलांमध्ये गंभीर स्वरूपाची लक्षणे दिसून आलेली नाहीत.राज्यात शुन्य ते १० वर्षे वयोगटातील टक्केवारी ३.४६ टक्केआरोग्य वैद्यकीय शिक्षण विभागाने सादर केलेल्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात शुन्य ते १०वर्षे वयोगटात १०५९ रुग्णांची नोंद झाली असून, याची ३.४६ टक्केवारी आहे. तर ११ ते २० वयोगटात २१०९ रुग्णांची नोंद झाली असून याची ६.९० टक्केवारी आहे. नागपुरात आतापर्यंत नोंद झालेल्या ३७१ रुग्णांच्या तुनलेत शुन्य ते १५ वर्षे वयोगटात ५० रुग्ण आढळून आले आहेत. याची टक्केवारी १३.५१ आहे. हे राज्याच्या तुलनेत ही संख्या मोठी असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे.३२ मुले, १८ मुलीनागपुरात नोंद झालेल्या ५० लहान मुलांमध्ये ३२ मुले तर १८ मुली आहेत. यात एक वर्षाखालील दोन बालके आहेत. एक ते पाच वर्षापर्यंतची आठ बालके, तर सहा ते १५ वर्षांपर्यंतची ४० बालके आहेत.मेयो, मेडिकलमधून २४ बालकांना सुटीमेडिकलमधून आतापर्यंत सहा तर मेयोमधून १८ असे एकूण २४ बालकांना सुटी देण्यात आली आहेत. अजूनही २६ बालके उपचार घेत आहेत. तुर्तास तरी एकाही बालकाचा मृत्यूची नोंद नाही.दोन तृतीयांश बालकांमध्ये सौम्य लक्षणेलागण झालेल्यांपैकी साधारण दोन तृतीयांश मुलांमध्ये बारीक ताप, खोकला, घसा खवखवणे, सर्दी आणि शिंका अशी हलकी लक्षणं दिसून आली आहेत. यातील बहुसंख्य मुलांवर उपचार होऊन ती घरी परतल्याचे डॉक्टर सांगतात.चार चिमुकल्यांचा अहवाल १४ व्या दिवशी पॉझिटिव्ह१४ व्या दिवशी पॉझिटिव्ह अहवाल येणाºया रुग्णांची संख्या चार आहे. यांचे वयोगट दोन ते पाच वर्षे आहेत. हे चारही रुग्ण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) बालरोग विभागात उपचार घेत आहेत. यांची प्रकृती स्थीर असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.कारोनाबाधित लहान मुलांपासून इतरांना संसर्ग होऊ शकताकोरोना विषाणू संबंधात तुर्तास तरी असे आढळून आले की लहान मुलांना याची लागण होण्याचे प्रमाण कमी आहे. असे असले तरी त्यांना याची लागण होणारच नाही असे नाही. मुलांमध्ये गंभीर लक्षण नसली आणि त्यांना याचा फार कमी धोका असला तरी ते इतरांना होणाºया संसगार्चं कारण नक्कीच बनू शकतात. यामुळे लहान मुलांची अधिक काळजी घेणे आवश्यक आहे.-डॉ. संजय जयस्वालबालरोग तज्ज्ञ व उपसंचालक, आरोग्य विभाग नागपूर