लाकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर शहराची लोकसंख्या ३० लाखाच्या आसपास आहे. शहरात बुधवारी सायंकाळपर्यंत एकूण २,९८,३४७ लाभार्थींनी कोरोना लस घेतली आहे. २,७४,५१३ लोकांनी पहिला, तर २३,८३४ जणांनी घेतला दुसरा डोस घेतला आहे. तर बुधवारी एका दिवशी १२,४५३ लोकांनी लस घेतली.
नागपूर शहरात १६ जानेवारीपासून आरोग्य सेवक, २ फेब्रुवारीपासून फ्रंटलाईन वर्करला कोरोना लस दिली जात आहे. १ मार्चपासून ६० वर्षे वयावरील तर ४५ वर्षांवरील गंभीर आजार असलेल्यांना लस दिली जात आहे. १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील सर्व लोकांना लस देण्याचे आदेश जारी करण्यात आले. सध्या दररोज ११ ते १२ हजार लोकांना लस दिली जात आहे. आतापर्यंत ६० वर्षांहून अधिक वयाच्या १ लाख २३ हजार ५१३ लाभार्थींनी लस घेतली आहे.
लसीकरणाला अधिक गती देण्यासाठी ८४ लसीकरण केंद्राशिवाय पुन्हा ५१ नवीन लसीकरण केंद्र सुरू केली जात आहेत.
नागपूर शहरातील लसीकरण (७ एप्रिलपर्यंत)
पहिला डोस
आरोग्य सेवक - ४०,२४१
फ्रंटलाईन वर्कर - ३२,८५४
४५ वर्षांवरील - २५,९५७
४५ वर्षांवरील आजारी - ५२,३११
६० वर्षांवरील - १,२३,१५०
एकूण - २,७४,५१३
दुसरा डोस
आरोग्य सेवक - १४,६९७
फ्रंटलाईन वर्कर - ७,११८
४५ वर्षांवरील - २६
४५ वर्षांवरील आजारी - २८४
६० वर्षांवरील - १७०९
एकूण - २३,८३४