लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशभरातील १११ शहरात करण्यात आलेल्या सर्वेक्षणाच्या आधारावर जीवनमान निर्देशांकाची यादी जाहीर करण्यात आली. यात नागपूर शहर ३१ व्या क्रमांकावर आहे. देशातील टॉपटेन शहरात महाराष्ट्रातील पुणे, नवी मुंबई व ग्रेटर मुंबई यांनी स्थान मिळविले आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात मात्र नागपूर अव्वलस्थानी आहे. तर स्वच्छता सर्वेक्षणात नागपूरचा ५५ वा क्रमांक आहे. क्रमवारीचा विचार करता नागपूर अजूनही जीवनमान सुविधांच्या बाबतीत मागे आहे. शासकीय, सामाजिक, आर्थिक व भौतिक संरचनेच्या आधारावर हे सर्वेक्षण करण्यात आले. दरम्यान नागपूर शहराला मिळालेल्या ३१ व्या क्रमांकाबाबत महापौर नंदा जिचकार यांनी समाधान व्यक्त केले आहे. नागपूर शहराची स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. शहरातील प्रदूषण कमी करण्यासाठी ई-रिक्षा, ई-कार चालविली जात आहे. भविष्यात इलेक्ट्रिक बस धावणार आहेत. प्रदूषण कमी करण्यात नागपूर टॉप टेन शहराच्या यादीत येईल. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात शहराचा सर्वांगिण विकास होत आहे. दूषित पाण्यावर प्रक्रियेत १३ वा क्रमांक मिळणे ही सकारात्मक बाब आहे.
जीवनमान निर्देशांकाच्या यादीत नागपूर ३१ व्या क्रमांकावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 10:53 AM
देशभरातील १११ शहरात करण्यात आलेल्या सर्वेक्षणाच्या आधारावर जीवनमान निर्देशांकाची यादी जाहीर करण्यात आली. यात नागपूर शहर ३१ व्या क्रमांकावर आहे.
ठळक मुद्देस्वच्छता सर्वेक्षणात नागपूर ५५ व्या क्रमांकावर