लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अधिकारी बनून फिरणारा भंडारा येथील ठगबाज प्रशांत भाऊराव वाहाणे आणि त्याचा साथीदार मुरलीधर सदावर्ती (उमरेड) याने पाचपावलीतील एका ज्येष्ठ नागरिकाकडून ३५ लाख रुपये हडपल्याची खळबळजनक माहिती पुढे आली आहे.पाचपावलीतील नाईकवाडी, बांगलादेश पोलीस चौकीसमोर सागर शंकरराव तलघरे (वय ६०) राहतात. आरोपी सदावर्ती हा तलघरेचा नातेवाईक आहे. तलघरे यांचे बांगलादेश पोलीस चौकीसमोर चणे-फुटाण्याचे दुकान आहे. ते मुला-मुलीच्या नोकरीसाठी धडपडत असल्याचे पाहून सदावर्ती याने मार्च २०१७ मध्ये त्यांच्याशी संपर्क साधून तुमच्या मुलाला आणि मुलीला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळात भंडारा येथे नोकरी लावून देतो, असे सांगितले. त्याने तलघरे यांची ठगबाज वाहाणेसोबत भेट घालून दिली. वाहाणेने मोठ्या पदावर कार्यरत असल्याचीही बतावणी केली. तर, वाहाणेने शासकीय नोकरी आणि मोठ्या पगाराची थाप मारून तलघरे यांच्या मुला-मुलीला नोकरी देण्याचे मान्य केले. त्याबदल्यात सदावर्ती आणि वाहाणे या जोडगोळीने तलघरे यांच्याकडून १४ लाख रुपये घेतले. आपल्या मुलांसोबतच अन्य काहींचीही शिफारस तलघरेंनी केली अन् आरोपींकडे पुन्हा २१ लाख रुपये दिले. अशा प्रकारे आरोपींनी एकूण ३५ लाख रुपये घेतले. २८ मार्च २०१७ ते २७ सप्टेंबर २०१८ या कालावधीत हा सर्व व्यवहार झाला. त्या बदल्यात आरोपींनी तलघरेंच्या मुला-मुलीला आणि अन्य पीडितांना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे बनावट नियुक्तीपत्र आणि ओळखपत्र दिले. शासकीय नोकरी मिळाल्याच्या आनंदात पीडितांनी पेढे वाटले आणि हे नियुक्तीपत्र घेऊन ते मंडळाच्या कार्यालयात गेले. हे नियुक्तीपत्र बनावट असल्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी पीडितांना पोलिसांकडे जाण्याचा सल्ला दिला. त्यामुळे पीडितांना सदावर्ती वाहाणेच्या जोडगोळीने आपली फसवणूक केल्याचे लक्षात आले. त्यांनी पाचपावली ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. ठाणेदार अशोक मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गोडबोलेंनी सदावर्तीला अटक केली. ठगबाज वाहाणेचा शोध घेतला जातभूखंडही गमावलानोकरीमुळे मुलांचे भविष्य उज्ज्वल होईल, या भावनेतून आरोपींना रक्कम देण्यासाठी पीडितांपैकी एकाने आपला बेसा येथील भूखंड विकला. त्यातून आलेली रक्कम ठगबाज वाहाणे आणि सदावर्तीच्या हातात दिली. ठगबाजांनी ही रक्कम गिळंकृत केली.
नागपुरात नोकरीच्या नावाखाली ३५ लाख हडपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2019 8:03 PM
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अधिकारी बनून फिरणारा भंडारा येथील ठगबाज प्रशांत भाऊराव वाहाणे आणि त्याचा साथीदार मुरलीधर सदावर्ती (उमरेड) याने पाचपावलीतील एका ज्येष्ठ नागरिकाकडून ३५ लाख रुपये हडपल्याची खळबळजनक माहिती पुढे आली आहे.
ठळक मुद्देबनावट नियुक्तीपत्रही दिले : ठगबाज वाहाणेसह दोघांवर गुन्हा दाखल