लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शहरात पाण्याची समस्या दिवसेंदिवस बिकट होत आहे. यातच दूषित पाण्यामुळे होणारे आजार वाढले आहेत. गेल्या महिन्यात गॅस्ट्रोचा ३९६ रुग्णांची नोंद झाली आहे. पाणी समस्येसोबतच वाढत्या तापमानामुळे होणाऱ्या उष्माघाताचे रुग्णही वाढले आहेत. एप्रिल महिन्यात १९२ रुग्ण आढळून आले आहेत. तूर्तास या आजाराच्या एकाही मृत्यूची नोंद नाही.दूषित अन्न व पाण्यामुळे होणारा गॅस्ट्रो हा उन्हाळ्यात व पावसाळ्यात सर्वात जास्त आढळून येतो. या आजाराच्या उपचारासाठी महानगरपालिकेचा आरोग्य विभागाचे आयसोलेशन हॉस्पिटल सज्ज आहे. येथील बाह्यरुग्ण विभागात रोज ८० ते ९० रुग्ण उपचारासाठी येतात. एप्रिल महिन्यात या हॉस्पिटलमध्ये ३९६ रुग्णांना भरती करून उपचार करण्यात आले. साधारण एक किंवा दोन दिवस ठेवून रुग्णालयातून त्यांना सुटी देण्यात आली. मे आणि जून महिन्यापर्यंत या आजराच्या रुग्णांत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वाढत्या रुग्णांना घेऊन हॉस्पिटलमध्ये आवश्यक औषधे उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती आहे.उष्माघात वाढतोयगेल्या काही दिवसांत शहराच्या तापमानात घट आली असतानाही उष्माघाताचा रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. एप्रिल महिन्यात १९२ रुग्णांची नोंद झाली आहे. महानगरपालिकेच्यावतीने या आजराला घेऊन मनपाच्या इस्पितळात आवश्यक सोयी उपलब्ध करून दिल्या आहेत. दुपारी १२ ते ३ या वेळात कष्टाची कामे न करण्याचा सल्लाही दिला आहे.झाव काढू नकाउन लागले म्हणून आजही अनेक घरांमध्ये थंड पाण्यात फडा (झाडू) भिजवून उघड्या अंगावर ते शिंपडतात व नंतर त्याकडे दुर्लक्ष करतात. यामुळे आजार कमी होण्यापेक्षा तो वाढतो. उन लागू नये म्हणून भरपूर पाणी पिऊनच घरून निघा. उन्हापासून वाचण्याकरीता कान, नाक, डोके झाकले जाईल असे कापड बांधा. सैल सूती पांढऱ्या कपड्याचा वापर करा. खिशात पांढरा कांदा ठेवा. उन्ह लागल्यासारखी लक्षणे दिसल्यास पांढऱ्या कांदाचा रस काढून चार थेंब नाकात टाका. कांद्याचा रस तळपायाला चोळा. शरीर थंड करण्यासाठी बत्तासे किंवा खडीसाखर पाण्यात घोळून ते प्या.डॉ. गणेश मुकावारअधिष्ठाता, आयुर्वेद रुग्णालय
नागपुरात गॅस्ट्रोचे ३९६, उष्माघाताचे १९२ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2019 8:27 PM
शहरात पाण्याची समस्या दिवसेंदिवस बिकट होत आहे. यातच दूषित पाण्यामुळे होणारे आजार वाढले आहेत. गेल्या महिन्यात गॅस्ट्रोचा ३९६ रुग्णांची नोंद झाली आहे. पाणी समस्येसोबतच वाढत्या तापमानामुळे होणाऱ्या उष्माघाताचे रुग्णही वाढले आहेत. एप्रिल महिन्यात १९२ रुग्ण आढळून आले आहेत. तूर्तास या आजाराच्या एकाही मृत्यूची नोंद नाही.
ठळक मुद्दे मृत्यूची नोंद नाही : आरोग्य विभागाचे खबरदारीचे आवाहन