नागपूर : मार्च महिन्याचा अखेरचा आठवडा सुरू झाला असताना नागपुरात पारा चढायला लागला आहे. होळीच्या दिवशी म्हणजे बुधवारी नागपूरचे तापमान ४० अंशांजवळ पोहोचले होते. येत्या काही दिवसांत शहरातील उकाड्यात वाढ होणार असून एकूणच उन्हाळा तापण्याची चिन्हे आहेत.मार्च महिन्याच्या सुरुवातीला नागपुरात अवकाळी पाऊस आला होता व वातावरणात थंडावा निर्माण झाला होता.परंतु गेल्या आठवड्यापासून तापमान वाढण्यास सुरुवात झाली आहे. बुधवारी शहरात कमाल ३९.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. सरासरीहून हे तापमान २ अंशांनी अधिक होते.त्यामुळे आता सातत्याने शहरातील तापमानात वाढ होण्यास सुरुवात होणार असल्याचे संकेत आहेत. दुपारी तर आतापासूनच प्रचंड उकाडा जाणवण्यास सुरुवात झाली आहे. (प्रतिनिधी)
नागपूर @३९.९
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2016 2:33 AM