- योगेश पांडे नागपूर : भारतात वाईटापेक्षा ४० पट अधिक चांगले काम होत असल्याचे प्रतिपादन सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी केले. गुरुवारी त्यांनी नागपुरातील स्नेहांचल या कर्करोग रुग्णांच्या वेदना उपशमन केंद्राला भेट दिली.त्यावेळी आयोजित कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते.
सेवा कार्य करुणा, दया भावनेतून होत असले तरी आपल्याकडे जवळपास सर्वच सेवा कार्य आपुलकीने होतात. सेवा करताना आपणही पवित्र होतो. अहंकार आला तर त्यात सेवा राहत नाही. भारतात सेवा करताना आपलेपण आहे व ते ठिकठिकाणी जाणवते. जो आयुष्यात सेवा करतो त्याच्या आयुष्याचे सार्थक होते. मानवाला जन्मापासून क्लेश येत असतात. जीवनातील हे क्लेश हरण करण्याचे काम स्नेहांचल करत आहे. मी भारतभर फिरत असतो. यावेळी सेवा काम करणारे अनेकजण भेटतात. त्यांनाही स्नेहांचलच्या सेवभावाबाबत माहिती देईल, असेही सरसंघचालकांनी यावेळी सांगितले.