- सुमेध वाघमारेनागपूर - ६८व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्यानिमित्ताने समता सैनिक दलाने संविधान चौक ते दीक्षाभूमीपर्यंत उत्कृष्ट पथसंचालन करून अनेकांचे लक्ष वेधले. पथसंचालनात प्रथम भिक्खू संघ, नंतर पंचशिलेचा ध्वज हाती घेतलेला युवक आणि त्याच्या मागे निळ्या गणवेशातील शेकडो भीम सैनिक चालत होते. चौका-चौकांमध्ये काठी, दांडपट्ट्याच्या कसरती केल्या जात होत्या.
समता सैनिक दलाचे केंद्रीय संघटक सुनील सारिपुत्त, प्रकाश दर्शनिक, अशोक बोंदाडे, दीपक वाघमारे, पुरुषोत्तम संबोधी, किशोर चहांदे यांच्या मार्गदर्शनात संविधान चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून धम्मक्रांती अभिवादन मार्च दीक्षाभूमीकडे निघाला. मॉरिस कॉलेज टी-पॉर्इंट चौक, व्हेरायटी चौक, सीताबर्डी, लोकमत चौक , सेंट्रल बाजार मार्गाने हा मार्च दीक्षाभूमी येथे पोहचला. या दरम्यान समता सैनिक दलाच्या शेकडो जवानांनी शिस्तबद्ध पद्धतीने पथसंचालन केले. काठी, दांडपट्ट्याच्या कसरती करून लक्षही वेधले. दीक्षाभूमीवर पोहचताच जयबुद्ध-जयभीमच्या जय घोष करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मानवंदना देण्यात आली. या मार्चमध्ये जापान, श्रीलंका येथील भन्तेही सहभागी झाले होते. मार्चमध्ये देशाच्या कानाकोपºयातून सहभागी झालेल्या सैनिकामध्ये तरुण-तरुणींची संख्या मोठी होती. समता सैनिक दलाचे केंद्रीय संघटक सुनील सारिपुत्त यांनी ‘लोकमत’ला सांगितले, समता सैनिक दलाच्यावीने ६ ते १३ आॅक्टोबर दरम्यान कामठी रोड बुद्धभूमी येथे राष्टÑीय धम्मक्रांती महााशिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दीक्षाभूमीवरून हे सर्व सैनिक या महाशिबिरात सहभागी होतील