शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसे कार्यकर्त्यांनी मनसेच्या उमेदवाराचेच कार्यालय फोडले; अकोल्यात मोठा राडा, नेमके काय घडले...
2
मी कुठे सांगतो माझा प्रचार करा, विरोध अपेक्षितच; नवाब मलिक भाजप नेत्यांवर कडाडले
3
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
4
सदा सरवणकरांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट, माहिमच्या जागेवर चर्चा, मोठा निर्णय होणार?
5
गॅस सिलिंडर, UPI पेमेंट ते तिकीट बुकिंग; आजपासून बदलले 'हे' नियम बदलले, थेट खिशावर होणार परिणाम
6
आजचे राशीभविष्य : आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
7
अमृता खानविलकरची स्वप्नपूर्ती! घेतलं नवीन घर, व्हिडीओ शेअर करत दाखवली झलक
8
Laxmi Pujan Muhurta 2024: लक्ष्मीकुबेर पूजन कधी आणि कसं करावं? दाते पंचांगाने दिली सविस्तर माहिती!
9
५ वर्षांनी 'आई कुठे...' मालिका संपणार! मिलिंद गवळींची पोस्ट, म्हणाले- "ठाण्यातील ज्या बंगल्यात शूट केलं तिथे..."
10
दिवाळी झटका! LPG सिलिंडरचा भाव वाढला, पटापट चेक करा दिल्ली ते मुंबईपर्यंतचे नवे दर
11
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
12
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
13
'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने गाठला दिवाळीचा मुहुर्त, घरी आणली नवी कोरी मर्सिडीज
14
मनोज जरांगेंचे ‘एमएमडी’ समीकरण; विधानसभा लढवण्याची घोषणा
15
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
16
निवडणुकीतील गैरप्रकार थांबवा, अन्यथा कारवाई, मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचा इशारा
17
राज्यातील बेरोजगारीवर न बोलणारे हे कसले सरकार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल
18
राज्यात आलेली सर्वाधिक परकीय गुंतवणूक फडणवीसांच्या नावावर
19
आयपीएल रिटेंशन : रोहित शर्मा मुंबईकडेच; माही केवळ ४ कोटींमध्ये खेळणार
20
राहुल गांधींचे महाराष्ट्रातील ‘गॅरंटी कार्ड’ही फ्लॉप होणार : देवेंद्र फडणवीस 

नागपूर: नागपुरात कॉरोनाबाधित ७० वर्षीय रुग्णाचा मृत्यू, मृतांची संख्या दोन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2020 3:56 PM

उपराजधानीत कोरोनाबाधित ७० वर्षांच्या एका वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. सध्या शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १३३ एवढी आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: उपराजधानीत कोरोनाबाधित ७० वर्षांच्या एका वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. सध्या शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १३३ एवढी आहे,  तर  मृतांची दोन झाली आहे यातील बहुसंख्य रुग्णांना लक्षणे नाहीत. सतरंजीपुरा या भागातील शेकडो नागरिकांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. मेडिकलमधील चार रुग्ण सोडल्यास इतरांना क्रिटीकल केअरचीही गरज पडलेली नाही. यामुळे १४दिवसांत नमुने निगेटिव्ह येऊन रुग्ण घरी जात असल्याने रुग्णांसोबत डॉक्टर, परिचारिका व कर्मचऱ्यांमध्ये समाधानाचा भाव आहे. मंगळवारी ३८, २४ व १७ वर्षीय पुरुष रुग्णाला मेयोतून घरी सोडण्यात आले. हे तिनही रुग्ण जबरलपूर येथील रहिवासी आहेत. १३ एप्रिल रोजी त्यांना मोमीनपुरा येथून आमदार निवासात क्वारंटाइन करण्यात आले होते. १७ एप्रिल रोजी या तिघांचा नमुन्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यामुळे मेयोमध्ये दाखल करण्यात आले. सतरंजीपुऱ्यातील २८वर्षीय पुरुष, ४५, ४५ व ३८वषीय महिला यांचेही नमुने पॉझिटिव्ह आले होते. १४ दिवसांच्या उपचारानंतर २५ आणि २७ एप्रिल रोजी तपासण्यात आलेले नमुने निगेटिव्ह आले. यामुळे या सातही रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. सलग दुसºया दिवशी सात रुग्ण रुग्णालयातून घरी जात असल्याने मेयोचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया, नोडल अधिकारी डॉ. रवी चव्हाण, उपवैद्यकीय अधिक्षक डॉ. सागर पांडे, औषधवैद्यक शास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. तिलोत्तमा पराते व मेट्रन साधना गावंडे यांनी कोविड वॉर्डात सेवा देणाऱ्यांचे कौतुक केले. या रुग्णांसह मेयोतून आतापर्यंत १९ तर मेडिकलमधून १७रुग्ण असे एकूण ३६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस