शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआकडून लाडकी बहीण योजनेच्या कालावधीबाबत शंका; देवेंद्र फडणवीस ठामपणे म्हणाले...
2
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
3
भक्तांसाठी आनंदाची बातमी: निमगाव खंडोबा क्षेत्र विकासासाठी २४ एकर जमीन; शासन निर्णय जारी 
4
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
5
धक्कादायक! प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणीने केली तरुणीची हत्या
6
"खोट्याच्या कडू घोटावर विकासाची गॅरंटी भारी पडली’’, हरयाणातील विजयानंतर मोदींचा टोला 
7
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी
8
"हरयाणात भाजपा EVMमध्ये छेडछाड करून जिंकला, हा निकाल मान्य नाही’’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
9
हरयाणात झाली रोमांचक लढत, अवघ्या ३२ मतांनी फैसला, अखेरीस जिंकलं कोण? पाहा 
10
"...यामुळेच हा ऐतिहासिक विजय झाला"; हरयाणाच्या निकालावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया
11
Haryana Assembly Election Results 2024 : दिल्लीच्या जवळपास कमळाची कमाल, आम आदमी पार्टी बेहाल; डिपॉझिटही वाचलं नाही!
12
J&K मध्ये फुटीरतावादाचा सुपडा साफ, एआयपी आणि जमात-ए-इस्लामीला मतदारांनी नाकारले
13
हरयाणा निवडणुकीचे 'मॅन ऑफ मॅच' ठरलेल्या CM नायबसिंग सैनी यांची संपत्ती किती?
14
Ola नंतर Ather नं इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमती केल्या कमी, आता स्वस्तात खरेदी करण्याची संधी!
15
जुन्नरमध्ये आयात उमेदवाराच्या हाती तुतारी दिल्यास बंड अटळ?; मविआतील नाराज निष्ठावंतांच्या गोटात हालचालींना वेग
16
गेल्या महिन्यात कोणत्या कंपनीनं सर्वाधिक विकल्या Electric Scooters?
17
"महाराष्ट्रातील जनताही अशा फेक..."; हरयाणातील निकालानंतर CM शिंदेंचा MVA वर 'वार'
18
"आपण तर खरोखरच मोठी 'पनौती' निघालात, हुड्डांनाही..."; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा राहुल गांधींवर निशाणा
19
बुलेट ट्रेन जितकी खास, तितकीच स्टेशनही... वीज बचत अन् प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य!
20
नायब सिंह सैनींनी मारली बाजी; विजयादशमीला घेऊ शकतात मुख्यमंत्रीपदाची शपथ?

Nagpur: मेडिकलमधील बनावट टॅब्लेट प्रकरणात चार कंपन्यांच्या मालक-संचालकांविरोधात गुन्हा दाखल

By योगेश पांडे | Published: October 03, 2024 9:42 PM

Nagpur News: मेडिकलमध्ये ‘रिक्लॅव्ह ६२५’ ही अॅण्टीबायोटिक औषधी बनावट असल्याची बाब उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणात बनावट औषधांच्या खरेदी-विक्रीची चार कंपन्यांची साखळी असल्याची बाब समोर आली आहे.

- योगेश पांडे  नागपूर - मेडिकलमध्ये ‘रिक्लॅव्ह ६२५’ ही अॅण्टीबायोटिक औषधी बनावट असल्याची बाब उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणात बनावट औषधांच्या खरेदी-विक्रीची चार कंपन्यांची साखळी असल्याची बाब समोर आली आहे. अजनी पोलीस ठाण्यात अखेर चारही कंपनीचे मालक व संचालकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ‘लोकमत’नेच सर्वात अगोदर हे प्रकरण उघडकीस आणले होते हे विशेष.

या प्रकरणात पोलिसांनी कोल्हापूरमधील विशाल एन्टरप्रायझेसचा सुरेश दत्तात्रय पाटील, गुजरातमधील सूरत येथील फार्मासिक्स बायोटेकची मालक प्रिती सुमित त्रिवेदी, भिवंडीतील ॲक्वेंटीस बायोटेकचा मालक मिहीर त्रिवेदी, मिरा रोड, ठाणे येथील काबिज जेनेरिक हाऊसचा मालक विजय शैलेंद्र चौधरी व एका अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. नागपूरच्या ‘एफडीए’ने नुकतेच जिल्हा शल्यचिकित्सक नागपूरच्या अंतर्गत येणाऱ्या आरोग्य विभागाच्या औषधी भांंडारातील बनावट औषधीचा पर्दाफाश केला. अॅण्टीबायोटिक असलेली ‘रेसीफ-५००’ नावाचा औषधीत 'सिप्रोफ्लोक्सासिन'नावाची औषधीच नसल्याचे तपासणीत आढळून आले. गुजरात येथील ‘रिफायंड फार्मा’ नावाच्या या कंपनीचे हे औषध असले तरी ही कंपनी अस्तित्वातच नसल्याची बाब चौकशीतून समोर आले. या प्रकरणात कळमेश्वर पोलिसांनी याच महिन्यात सहा जणांना अटक केली होती. हे प्रकरण ताजे असताना ‘एफडीए’च्या तपासणीत वैद्यकीय शिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्याल व रुग्णालयाच्या (मेडिकल) औषधी भांडारातून ‘रिक्लॅव्ह ६२५’ या अॅण्टीबायोटिक औषधी बनावट निघाल्याने खळबळ उडाली आहे. अन्न व औषधी प्रशासनाचे औषधी निरीक्षक नितीन भांडारकर यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम २७६, ३४, ४२०, ४६८, ४७१ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

अशी होती पुरवठा साखळीया प्रकरणात काबिज जेनेरिक हाऊसकडून बाजारातून हे बनावट औषध खरेदी करण्यात आले होते. त्यांनी जुलै महिन्यातच ॲक्वेंटीस बायोटेकला विक्री केली. तर ॲक्वेंटीसने ही औषधे फार्मासिक्स बायोटेकला विकली. फार्मासिक्स बायोटेककडून कोल्हापुरमधील विशाल एन्टरप्रायझेसने औषधे खरेदी केली होती. त्याच औषधांचा मेडिकलमध्ये पुरवठा करण्यात आला.

दोन आरोपी अगोदरपासूनच अटकेतया रॅकेटमधील मिहीर त्रिवेदी व विजय शैलेंद्र चौधरी या आरोपींना अगोदरपासूनच अटक करण्यात आली आहे. चौधरीविरोधात कळमेश्वरसोबतच भिवंडी, नांदेड व वर्धा येथेदेखील गुन्हे दाखल आहेत. तर त्रिवेदीदेखील त्याच प्रकरणात आरोपी होता व त्यालादेखील पोलिसांनी अटक केली होती. या आरोपींची नागपूर पोलिसांकडून लवकरच चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :nagpurनागपूरCrime Newsगुन्हेगारीMedicalवैद्यकीय