लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लुटमारीच्या प्रकरणातील एका आरोपी व्यापाऱ्यास मुंबई पोलिसांनी सीआयएसएफच्या मदतीने विमानतळावर पकडले. त्याच्याजवळून ७ लाख ५६ हजार रुपयेही जप्त करण्यात आले. शब्बन शब्बीर खान (३६) असे आरोपीचे नाव आहे.पोलीस सूत्रानुसार खान मूळचा उत्तर प्रदेशचा रहिवासी आहे. तो गारमेंटचा व्यापारी आहे. मुंबईतील निर्मल नगरी पोलीस ठाणे हद्दीत राहणाºया एका महिलेच्या घरात घुसून लुटमार करण्यात आली होती. या प्रकरणात अज्ञात आरोपीच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान खान यात सामील असल्याचे आढळून आले. खान हा महिलेचा नातेवाईक आहे. तेव्हापासून खान व त्याच्या साथीदाराला मुंबई पोलीस शोधत होते.खान हा गारमेंटच्या व्यापारानिमित्त नागपूरला नेहमीच येत-जात असतो. तो येथे आल्यावर शिवशक्तीनगर टिपू सुलतान चौक कामठी रोड येथे राहतो. मुंबई पोलीस त्याच्यावर नजर ठेवून होते. खान सोमवारी सकाळी विमानाने परिवारासह दिल्लीला जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मुंबई पोलिसांनी सीआयएसएफला याची सूचना दिली. सूत्रानुसार सीआयएसएफचे निरीक्षक प्रशांत राऊत यांनी तपासणीदरम्यान खान व त्याच्या परिवाराला पकडले. त्यांनी सोनेगाव पोलिसांना याची सूचना दिली. सोनेगाव पोलिसांच्या मदतीने मुंबई पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतल्यावर त्याच्याजवळ ७ लाख ५६ हजार ५०० रुपये सापडले. मुंबई पोलीसचे पीएसआय आनंद पवार यांनी पैसे जप्त करून खानला ताब्यात घेतले. खानसोबत त्याची पत्नी, मुलगा आणि पुतण्याही होता. मुंबई पोलीस खानला घेऊन रवाना झाले.
नागपूर विमातळावर सापडला लुटमारीचा आरोपी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2018 12:56 AM
लुटमारीच्या प्रकरणातील एका आरोपी व्यापाऱ्यास मुंबई पोलिसांनी सीआयएसएफच्या मदतीने विमानतळावर पकडले. त्याच्याजवळून ७ लाख ५६ हजार रुपयेही जप्त करण्यात आले. शब्बन शब्बीर खान (३६) असे आरोपीचे नाव आहे.
ठळक मुद्देदिल्लीला जाताना सीआयएसएफने पकडले : ७.५६ लाख रुपये जप्त