नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आंतरराष्ट्रीय विमाने ये-जा करण्यावर केंद्र शासनाने गेल्या पावणे दोन वर्षांपासून निर्बंध टाकण्यात आले आहेत. पण घरगुती विमानाने नागपुरात येणाऱ्या प्रवाशांना दोन लसीकरणाचे बंधन आहे. ते आताही असून नवीन ओमायक्रॉनबाबतविमानतळ व्यवस्थापन सज्ज आहे. सर्व खबरदारी घेण्यात येत आहे.
आंतरराष्ट्रीय विमाने नागपुरात येत असल्यामुळे नागपूर विमानतळावर धोका कमीच आहे. एअर अरेबिया विमान कंपनीला मिळालेल्या शेड्युलनुसार कंपनी ५ डिसेंबरपासून नागपूर-शारजाह व शारजाह-नागपूर विमान सेवा सुरू करणार होती. पण नवीन विषाणूमुळे आंतरराष्ट्रीय विमानसेवा अडचणीत येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. नागपूर विमानतळावर सध्या घरगुती विमान सेवेदरम्यान महाराष्ट्र सरकारच्या सर्वच नियमांचे पालन करण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. शासन जे आदेश देतील, त्याचे पालन करण्यास व्यवस्थापनाची तयारी आहे.
विमानतळ व्यवस्थापनाला अजूनही नवीन नियमावली मिळालेली नाही. पण जुन्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यात येत आहे. विमान प्रवासादरम्यान प्रवाशांना दोन डोस बंधनकारक आहे. प्रवाशांची तपासणी करण्यात येत आहे.
आबिद रुही, वरिष्ठ विमानतळ संचालक, मिहान इंडिया लिमिटेड.