शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत मोदींच्या सभेसाठी वाहतूक मार्गात बदल; निवडणुकीसाठी काही रस्त्यांवर सहा दिवस नो पार्किंग!
2
"सरकार पाडण्यासाठी आमदारांना ५० कोटींची ऑफर...", मुख्यमंत्र्यांचा भाजपवर आरोप
3
आजचे राशीभविष्य - १४ नोव्हेंबर २०२४, सगळ्या कामात यश मिळाल्याने खूप आनंदी आणि प्रसन्न व्हाल
4
आजचा अग्रलेख: 'बुलडोझर'ला ब्रेक...
5
धक्कादायक! जळगावात गरोदर महिलेला घेऊन जाणाऱ्या ॲम्बुलन्समध्ये ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट; १५० फूट उंच उडाल्या चिंधड्या
6
शिवाजी पार्कवर आवाज कुणाचा?; १७ नोव्हेंबरला सभेसाठी मनसेला मंजुरी मिळण्याची शक्यता
7
मुंबईत प्लास्टिकच्या डब्यात तुकडे करून टाकलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले; प्रेमसंबंधाच्या विरोधातून हत्या!
8
नागपुरात कार्यकर्तेच बनले फडणवीसांच्या प्रचार मोहिमेचे सारथी
9
मार्कोची फास्टर फिफ्टी; पण शेवटी सूर्याची सेना जिंकली! आता फक्त टीम इंडियालाच मालिका विजयाची संधी
10
"आत टाका म्हणजे पक्षात टाका हे लोकांना कळलंच नाही"; ईडी कारवायांवरुन राज ठाकरेंची मिश्किल टिप्पणी
11
IND vs SA : विक्रमी धावसंख्येसह टीम इंडियाच्या नावे झाला सर्वाधिक शतकांचा खास रेकॉर्ड
12
"रोज उठतात अन्..."; ओ मोठ्या ताई, महासंसद रत्न, कुठलं बी टाकलं होतं? म्हणत चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
13
केंद्र सरकारनं मणिपूरमध्ये रातोरात पाठले 2000 CAPF जवान, आता कशी आहे जिरीबाम मधील स्थिती?
14
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! हंगामाच्या सुरुवातीलाच धानाला विक्रमी दर, केंद्र सरकारने 'ड्युटी' रद्द केल्याचा परिणाम
15
गौतम अदानी यांची मोठी घोषणा; अमेरिकेत करणार तब्बल ₹ 84 हजार कोटींची गुंतवणूक...
16
अन्... योगी आदित्यनाथांची सभाच रद्द झाली; भाईंदरचे भाषण ऐकविण्याचा प्रयत्न, नागरिक ३ तास ताटकळले
17
"पहिलं बटण दाबा, बाकीची खराब आहेत"; शिंदे गटाच्या कार्यकर्त्याकडून EVM बाबत चुकीचा प्रचार
18
सलग २ सेंच्युरीनंतर भोपळ्यावर भोपळा! Sanju Samson च्या नावे झाला लाजिरवाणा रेकॉर्ड
19
साहेब रिटायर झाल्यानंतर तुमच्याकडे कोण बघणार? अजित पवार म्हणाले,"मलाच आता..."
20
बाप डोक्यावर आणि मुले खांद्यावर घेऊन जगायची वेळ येईल...; उद्धव ठाकरेंची राणे पिता-पुत्रांवर टीका 

नागपूर विमानतळ : सात महिन्यात मिळाले ३१ कोटी रुपयांचा गैरपरिवहन महसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 03, 2018 11:29 PM

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रवासी व अन्य सेवांद्वारे मिहान इंडिया लिमिटेड(एमआयएल)ला गेल्या सात महिन्यात ३१ कोटी रुपयांचा गैरपरिवहन महसूल प्राप्त झाला आहे. विमानतळाचे व्यवस्थापन करणारी कंपनी एमआयएलच्या मते, प्रवाशांना सुविधा पुरविण्याच्या मोबदल्यात आकारण्यात येणाऱ्या शुल्कामुळे सोयीसुविधेत वाढ झाली आहे.

ठळक मुद्देक्यूट चार्ज मिळाल्यामुळे झाली वाढ : प्रवाशांच्या संख्येतही झाली वाढ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रवासी व अन्य सेवांद्वारे मिहान इंडिया लिमिटेड(एमआयएल)ला गेल्या सात महिन्यात ३१ कोटी रुपयांचा गैरपरिवहन महसूल प्राप्त झाला आहे. विमानतळाचे व्यवस्थापन करणारी कंपनी एमआयएलच्या मते, प्रवाशांना सुविधा पुरविण्याच्या मोबदल्यात आकारण्यात येणाऱ्या शुल्कामुळे सोयीसुविधेत वाढ झाली आहे.गैरपरिवहन महसुलात युजर डेव्हलपमेंट फी(यूडीएफ)च्या माध्यमातून एमआयएलला एप्रिल ते आॅक्टोबर २०१८ पर्यंत २७ कोटी ११ लाख ४३ हजार ५६३ रुपये प्राप्त झाले आहे. हा आकडा नियमित उड्डाण करणाऱ्या फ्लाईटचा आहे, तर नॉन शेड्यूल्ड फ्लाईटपासून २ कोटी ९३ लाख २६४ रुपये मिळाले आहे. नुकत्याच सीता सॉफ्टवेअरच्या माध्यमातून संचालित केली जात असलेली कॉमन युजर टर्मिनल एक्पिमेंट (क्यूट) सुविधेच्या माध्यमातून घेण्यात येणारे क्यूट शुल्काचे याच काळात १ कोटी ७१ लाख ९३ हजार ९८८ रुपये मिळाले आहे. विशेष म्हणजे क्यूट शुल्कापोटी गोळा होणाऱ्या महसुलाचा ४४ टक्के भाग एमआयएलला मिळत आहे.सद्यस्थितीत एअरपोर्टवर शेड्यूल फ्लाईट्सचे ४२ डिपार्चल व ४२ अरायव्हल आहे. त्याचबरोबर दर महिन्याला किमान ५० नॉन शेड्यूल्ड फ्लाईटसुद्धा येत-जात राहते. १ नोव्हेंबरपासून इंडिगोचे नागपूर-चेन्नई उड्डाण सुरू झाले आहे. यामुळेसुद्धा विमानतळाच्या गैरपरिवहन महसुलात वाढ झाली आहे. गेल्या दोन वर्षाच्या प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे. २०१६-१७ मध्ये नागपूर विमातळावरून १९ लाख ३८ हजार प्रवाशांचे येणे-जाणे झाले आहे तर २०१७-१८ मध्ये २१ लाख ७६ हजार ४३९ प्रवाशांनी नागपूर विमानतळावरून प्रवास केला आहे. 

आता लाईनमध्ये लागण्याची गरज नाहीविमानतळाच्या गैरपरिवहन महसुलात वाढ होत आहे. क्यूट सिस्टममुळे एअरलाईन्सला कॉमन काऊंटरची सुविधा मिळाली आहे; सोबतच प्रवाशांना लाईनमध्ये लागण्याचीसुद्धा आता गरज राहिली नाही. विमानतळाच्या आत प्रवाशांना प्रक्रिया पूर्ण करून लागणारा वेळसुद्धा कमी झाला आहे.विजय मुळेकर, वरिष्ठ विमानतळ संचालक, एमआयएल

 

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar International Airportडॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूरnagpurनागपूर