वसीम कुरैशी
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर जवळपास २० वर्षे जुन्या रडारच्या जागेवर नवीन रडारची उभारणी करण्यात येणार आहे. हे काम या महिन्याच्या अखेरीस होणार आहे. नवीन सिस्टिमच्या उभारणीसाठी काही मिनिटे रडार सेवा बंद राहणार आहे. आधुनिक रडारमध्ये एसएसआर व एमएसआर अर्थात प्रायमरी आणि सेकंडरी या दोन्ही रडारच्या सुविधांचा समावेश राहील.
सध्या विमानतळावर सेकंडरी रडार कार्यरत आहे. नया एल्डीज रडार उभारणीसाठी विमानतळ परिसरात हवामान विभागाच्या कार्यालयामागे इमारतीचे बांधकाम करण्यात येत आहे. मार्चच्या अखेरीस झेकोस्लाेव्हाकिया येथून एल्डीज कंपनीची चमू येणार असून सिस्टिमची उभारणी आणि चेक करतील. आधुनिक तंत्रज्ञानाच्या या रडारसह व्हाइस कम्युनिकेशन स्विचिंग सिस्टिम लावण्यात येत आहे. रडार कंट्रोलमध्ये टेलिफोनची जास्त आवश्यकता नसते.
नवीन रडारची वैशिष्ट्ये :
- नवीन रडार आपल्या नियंत्रण कक्षेत आकाशातील कोणत्याही धातूयुक्त वस्तूची माहिती देईल.
- हे रडार देशात १६ विमानतळावर बसविण्यात आले आहे. नागपूर १७ वे आहे.
- विमानांना पॉईंट टू पॉईंट उड्डाण करण्यास मदत करेल.
- हवाई वाहतूक मार्ग सहजरीत्या दिसतील.
- विमानाला थेट मार्ग उपलब्ध करून देण्यास अधिक सुविधा होईल.
हवाई वाहतूक नियमितरीत्या सुरू असते. यामध्ये रडार सिस्टिमची मदत महत्त्वपूर्ण ठरते. जुन्याऐवजी नवीन जागेवर रडार इमारत बनल्यानंतर संपूर्ण सिस्टिम लावणे आणि ती चेक केल्यानंतरच त्याचे स्थलांतरण होईल. हे काम या महिन्याच्या अखेरीस होईल.
- ए.ए. खरे, समन्वयन प्रभारी, भारतीय विमानतळ प्राधिकरण, नागपूर विमानतळ.