लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : इंदूर येथील ब्रिलियन्ट कन्व्हेन्शन सेंटर येथे आयोजित संयुक्त राष्ट्रसंघाच्या आठव्या रिजनल ‘थ्री आर फोरम इन एशिया अॅन्ड दि पॅसिफिक ’या आंतरराष्ट्रीय परिषदेत आशियातील ३७ शहरांतील महापौरांनी एका ऐतिहासिक घोषणापत्रावर स्वाक्षऱ्या केल्या. स्वच्छ परिसर, स्वच्छ हवा आणि शुद्ध पाण्यासाठी इंदूरच्या महापौर मालिनी गौड यांनी घोषणापत्र सादर केले. याचा नागपूर शहराला लाभ होणार आहे.घोषणापत्रावर नागपूरच्या महापौर नंदा जिचकार यांनीही स्वाक्षरी केली आहे. सन २०३० पर्यंत कचऱ्याच्या समस्येपासून मुक्ती मिळविणे हा या घोषणापत्राचा उद्देश आहे. यासाठी घोषणापत्रानुसार, थ्री आर या त्रिसूत्रीच्या आधारावर आशिया खंडातील सर्व देश एकत्र येऊन काम करतील आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या ‘मिशन झिरो वेस्ट’यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करतील. संयुक्त राष्ट्रसंघाच्या प्रत्येक वर्षी होणाऱ्या बैठकीत यावर करण्यात येणाऱ्या कामकाजाबाबत सर्व देश आपली भूमिका मांडतील, असा निर्णय परिषदेत घेण्यात आला.कचरामुक्तीकडे वाटचालसदर घोषणापत्र म्हणजे कचरामुक्तीच्या दिशेने टाकलेले सकारात्मक पाऊल आहे. या घोषणापत्रानुसार आता नागपूरमध्ये कचरामुक्तीसाठी, स्वच्छ हवा आणि शुद्ध पाण्यासाठी कार्य केले जाईल. आशिया खंडातील विविध देशांनी घेतलेल्या या पुढाकाराचा फायदा नागपूरला होईल.नंदा जिचकार, महापौर नागपूर.
आंतरराष्ट्रीय परिषदेतील घोषणापत्राचा नागपूरलाही लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 11:15 PM
इंदूर येथील ब्रिलियन्ट कन्व्हेन्शन सेंटर येथे आयोजित संयुक्त राष्ट्रसंघाच्या आठव्या रिजनल ‘थ्री आर फोरम इन एशिया अॅन्ड दि पॅसिफिक ’या आंतरराष्ट्रीय परिषदेत आशियातील ३७ शहरांतील महापौरांनी एका ऐतिहासिक घोषणापत्रावर स्वाक्षऱ्या केल्या. स्वच्छ परिसर, स्वच्छ हवा आणि शुद्ध पाण्यासाठी इंदूरच्या महापौर मालिनी गौड यांनी घोषणापत्र सादर केले. याचा नागपूर शहराला लाभ होणार आहे.
ठळक मुद्देइंदूर येथे आयोजन : महापौर नंदा जिचकार यांच्यासह देश-विदेशातील महापौरांचा सहभाग