लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जागतिक तंबाखूविरोधी दिनाच्या निमित्ताने राष्ट्रसंत तुकडोजी कॅन्सर हॉस्पिटलच्यावतीने तंबाखूविरोधी रॅली काढून जनजागृती करण्यात आली आहे. रॅलीचा समारोप कॅन्सरशी लढा देऊन विजय मिळविलेल्या रुग्णांच्या मनोगतातून झाला. याप्रसंगी ‘तंबाखू म्हणजेच कॅन्सर’ या विषयावर आयोजित रुग्णालयाच्या परिसरात चित्र प्रदर्शनाचे आयोजनही करण्यात आले होते.रॅलीची सुरुवात मानेवाडा रोडवरील कॅन्सर हॉस्पिटलमधून झाली. यावेळी तंबाखूमुळे होणारे विविध कॅन्सर, त्याची लक्षणे व उपचाराचे फलक घेऊन डॉक्टरांसह विद्यार्थी सहभागी झाले होते. या रॅलीमध्ये इंडियन मेडिकल असोसिएशन, व्ही.एस.पी.एम. दंत महाविद्यालय, श्री आयुर्वेदिक महाविद्यालय, झुलेलाल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, महाराष्ट्र नेत्ररोग संघटना, रेडिओलॉजीकल व इमेजींग असोसिएशन, नागपूर मेडिकोज, रोटरी क्लब नागपूर, लायन्स क्लब नागपूर मेडिकोज व नागपूर नोबल, कुंभलकर सोशलवर्क कॉलेज, मधुकरराव महाकाळकर नर्सिंग स्कूल, श्युअरटेक नर्सिंग कॉलेज, दळवी नर्सिंग कॉलेज, स्नेहांचल, हेडगेवार रक्तपेढी, प्रजापती ब्रम्हकुमारीज आंतरराष्ट्रीय विश्वविद्यापीठ, आधार फाऊंडेशन आदी संघटनांचा सहभाग होता. रॅलीला हिरवी झेंडी इंडियन मेडिकल असोसिएशनचे (आयएमए) अध्यक्ष डॉ. कुश झुनझुनवाला यांनी दाखवली.रॅलीच्या समारोपप्रसंगी आयोजित छोटेखानी कार्यक्रमात प्रजापती ब्रम्हकुमारी आशा दीदी यांनी अध्यात्म व सकारात्मकतेचे महत्त्व विशद केले. यातून कर्करोगाशी लढण्याचे आत्मबळ मिळते असेही त्या म्हणाल्या. कॅन्सर हॉस्पिटलचे संचालक डॉ. सुब्रजीत दासगुप्ता यांनी पालकांनी मुलांसमोर व्यसन करू नये, असे आवाहन केले. ते म्हणाले, मुलांना तंबाखू, खुटका, सिगारेट आणण्यास सांगितल्यास मुले त्या वस्तू चाखून पाहतात. पुढे त्याचे व्यसनात रुपांतर होते.संचालन रुग्णालयाचे सहसंचालक डॉ. बी.के. शर्मा यांनी केले. कार्यक्रमाला ‘आयएमए’चे डॉ. प्रकाश देव डॉ. रफत खान, डॉ. कपिल बहाई,डॉ. विरल शहा, डॉ. यश अग्रवाल, डॉ. मधुकर खेरडे, डॉ. अर्चना कोठारी, डॉ. वंदना काटे, डॉ. वैभव कारेमोरे, डॉ. आशिष खंडेलवाल, सुधाकर आचार्य, डॉ. गोपाळ अरोरा आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी अवतराम चावला, डॉ. पुर्णिमा चिंचमलातपुरे, डॉ. प्रसन्न जोशी, डॉ. सत्यशील सप्रे, डॉ. डी.पी. सेनगुप्ता, डॉ.अंजली कोल्हे, डॉ. उमाशंकर पछेल, डॉ. प्रफ्फुल चहांदे, डॉ. प्रशांत ढोक, डॉ. अनिरुद्ध वाघ, डॉ. आर. रणदिवे, डॉ. अमोल हेडाऊ, शाहिद अली, डॉ. राहुल ठाकरे आदींनी सहकार्य केले.
नागपुरात तंबाखूविरोधी जनजागृती रॅलीने वेधले लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2019 10:16 PM
जागतिक तंबाखूविरोधी दिनाच्या निमित्ताने राष्ट्रसंत तुकडोजी कॅन्सर हॉस्पिटलच्यावतीने तंबाखूविरोधी रॅली काढून जनजागृती करण्यात आली आहे. रॅलीचा समारोप कॅन्सरशी लढा देऊन विजय मिळविलेल्या रुग्णांच्या मनोगतातून झाला. याप्रसंगी ‘तंबाखू म्हणजेच कॅन्सर’ या विषयावर आयोजित रुग्णालयाच्या परिसरात चित्र प्रदर्शनाचे आयोजनही करण्यात आले होते.
ठळक मुद्देजागतिक तंबाधूविरोधी दिन : डॉक्टरांसह विविध सामाजिक संघटनांचा पुढाकार