शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
2
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
3
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
4
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
5
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
6
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
7
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
8
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
9
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
10
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
11
Eknath Shinde, Maharashtra CM Politics : “नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है...”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
12
भयंकर! व्लॉगरची हत्या करून २ दिवस मृतदेहासोबत राहिला बॉयफ्रेंड; काय आहे हे संपूर्ण प्रकरण?
13
क्रेडिट कार्डशिवाय एअरपोर्टवर लाउंजचा आनंद घ्या... 'या' डेबिट कार्ड्सद्वारे मिळेल ॲक्सेस 
14
“देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा पाठिंबा आहे का?”; भाजपाने केले स्पष्ट
15
महिला आणि पुरुषही का करतात एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर...? सामोर आली दोन कारणं!
16
Maharashtra Politics : मोदी-शाह म्हणतील तसं! जो मुख्यमंत्री ठरवाल, त्याला आमचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंनी जाहीरच करून टाकलं
17
"...अन्यथा तुम्हाला सरकारी नोकरी गमवावी लागेल", मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय
18
Baba Siddique : "मारेकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवण्यासाठी मिळाले ५० हजार"; आरोपीने दिली महत्त्वाची माहिती
19
शिंदे उद्या दिल्लीला जाणार! भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचीही बैठक होणार
20
"सगळ्या पदांपेक्षा लाडका भाऊ ही ओळख मोठी"; एकनाथ शिंदेंचं CM पदाबाबत सूचक विधान

नागपुरातील अपार्टमेंटचे पार्किंग बनले आंबटशौकिनांचा अड्डा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 10:37 PM

सदर येथील एक चर्चित अपार्टमेंटचे पार्किंग सध्या आंबटशौकिनांचा अड्डा बनले आहे. या पार्किंगचा वापर लैंगिक शोषणासाठी केला जात आहे. अपार्टमेंटच्या सीसीटीव्हीमध्येही या प्रकारचे कृत्य कैद झाले आहे. पोलीस आयुक्तालयापासून मोजक्याच अंतरावर असे कृत्य चालत असल्याने परिसरातील नागरिकही चिंतेत पडले आहे.

ठळक मुद्देरात्रीला होते लैंगिक शौषण : सीसीटीव्हीमध्ये कैद झाले कृत्य

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सदर येथील एक चर्चित अपार्टमेंटचे पार्किंग सध्या आंबटशौकिनांचा अड्डा बनले आहे. या पार्किंगचा वापर लैंगिक शोषणासाठी केला जात आहे. अपार्टमेंटच्या सीसीटीव्हीमध्येही या प्रकारचे कृत्य कैद झाले आहे. पोलीस आयुक्तालयापासून मोजक्याच अंतरावर असे कृत्य चालत असल्याने परिसरातील नागरिकही चिंतेत पडले आहे.सदर पोलीस ठाणे हद्दीत काटोल रोडवर छावणीकडे जाणाऱ्या चौकात ही इमारत आहे. अपार्टमेंटमध्ये कार्यालय आणि दुकाने आहेत. अपार्टमेंटच्या बेसमेंटमध्ये पार्किंग आहे. रात्री कार्यालय आणि दुकाने बंद झाल्यानंतर बेसमेंटमध्ये कुणीच फिरकत नाही. तेव्हा येथे गैरकृत्ये सुरू होतात. विकृत मानसिकतेने ग्रस्त लोक येथे येतात. ते बेसमेंटमध्येच गैरकृत्य करीत असतात. रात्री ११ वाजेपासून तर पहाटेपर्यंत अशा लोकांची येथे ये-जा असते. अलीकडे एका कार्यालयाच्या कर्मचाऱ्याला येथे संदिग्ध लोक दिसल्याने संशय आला. त्याने सीसीेटीव्ही फुटेज तपासून पाहिले तेव्हा खरा प्रकार उघडकीस आला. तिथे दोन तरुण आपत्तीजनक अवस्थेत आढळून आले. अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये अनेक दिवसांपासून हे प्रकार सुरू आहेत. परिसरात सीसीटीव्ही लागले असल्याची येथे येणाऱ्या लोकांनाही माहिती आहे. ते सीसीटीव्हीपासून स्वत:ला वाचवून असतात. परंतु दोन युवक सीसीटीव्हीमध्ये सापडल्याने हा प्रकार उघडकीस आला.या इमारतीच्या जवळच उड्डाण पुलाचे काम सुरू आहे. या कामात मोठ्या मशीनचा वापर केला जात आहे. या कामाशी संबंधित तंत्रज्ञाची अपार्टमेंटच्या बेसमेंटमध्ये नियमित ये-जा आहे. तो आपल्या हाताखाली काम करणारे मजूर आणि अल्पवयीन मुलांना पैशाचे आमिष दाखवून येथे आणतो. त्यांच्याशी बळजबरी करतो. अपार्टमेंटमधील अनेक लोकांना याबाबत माहितीही आहे. काही लोकांनी तर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडेही तक्रार केली आहे. परंतु तो तंत्रज्ञ असल्यामुळे कुठलीही कारवाई झाली नाही. या अपार्टमेंटच्या बेसमेंटमध्ये ज्या प्रकारे गैरकृत्य सुरु आहेत त्यामुळे भविष्यात एखादी मोठी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.असामाजिक तत्त्वांचाही वावरअपार्टमेंटच्या बेसमेंटमध्ये असामाजिक तत्त्वांचाही वावर असतो. ते नशेचे सेवन करतात. येथे पूर्वी हुक्का पार्लरही चालत होते. हुक्का पार्लर चालवणारा किक्रेट सट्ट्याशीही संबंधित होता. हुक्का पार्लर बंद पडले तरी नशा करणारे युवक येथे येतात. त्यांना येथे एमडी आणि दुसरे इतर नशेचे साहित्य सहज मिळते. एनडीपीएस सेललाही याचा माहिती आहे. परंतु अद्याप कारवाई झालेली नाही.सेक्स रॅकेटचेही तारसदर आणि राजनगर परिसरात अशा विकृत लोकांची कमतरता नाही. राजनगरातच युवकांचा एक समूह राहतो, तो लैेगिक संबंधांसाठी मुलांचा पुरवठा करतात. सोबतच हायप्रोफाईल सेक्स रॅकेटही चालवतात. या समूहाचा सूत्रधार इव्हेंट मॅनेजमेंटच्या नावाने काम करतो. त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर तरुण-तरुणी आहेत. त्यांना शहरातील पब व हॉटेलमध्ये नेहमीच पाहिले जाते. शनिवारी व रविवारी तो स्वत:च आयोजन करतो. यामध्ये मोजक्याच लोकांना प्रवेश दिला जातो.

 

टॅग्स :Sexual abuseलैंगिक शोषणnagpurनागपूर