लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आशा, गट प्रवर्तक कर्मचारी कृती समितीच्या वतीने आशा, गट प्रवर्तक, नर्सेस यांनी काळ्या फिती लावून शासनाच्या कामगार विरोधी धोरणाचा निषेध केला. कोरोना विषाणूचा प्रादुर्भावानंतर आशा गटप्रवर्तक व नर्सेस या स्वत:च्या जीवाची पर्वा न करता समर्पित भावनेने काम करीत आहेत. यातील बहुतांश कर्मचारी अल्प उत्पन्न गटातील व गरीब कुटुंबातील आहे. या कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा, सर्व कर्मचाºयांना मास्क, हॅण्ड ग्लोव्हज, सॅनिटायझर व कंटेन्मेंट एरियात काम करताना पीपीई किट उपलब्ध करून द्यावी, कर्मचाºयांची वैद्यकीय तपासणी करण्यात यावी, यासह अन्य मागण्यांकडे कर्मचाºयांनी काळ्या फिती लावून सरकारचे लक्ष वेधले. त्यांच्या मागण्या मान्य नाही केल्या तर तीव्र आंदोलन करणार आहे, असे सिटुचे अध्यक्ष राजेंद्र साठे, प्रीती मेश्राम, रंजना पौनीकर यांनी प्रसिद्धिपत्रकातून स्पष्ट केले.