लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशातील इतर राज्यांप्रमाणेच नागपूरच्या विविध भागातही एटीएममधून पैसे निघत नाहीत. पैसे काढण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांना एका एटीएमकडून दुसऱ्याकडे भटकावे लागत आहे. कुठेच पैसे मिळत नसल्याने लोक त्रस्त झाले आहेत.लोकमतने शहरातील विविध भागात लागलेल्या एटीएमचा आढावा घेतला असता, बहुतांश एटीएममध्ये पैसेच नसल्याचे आढळून आले. काही एटीएमच्या बाहेर तर ‘नो कॅश’चे बोर्ड लागले आहेत. काही ठिकाणी तर एटीएममधून पैसे काढण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यावरही पैसे मिळत नसल्याच्या घटना घडल्या आहेत. काही राष्ट्रीयीकृत बँकांचे एटीएम तांत्रिक कारणांमुळे बंद पडले आहेत. एटीएममधून पैसेच मिळत नसल्याने आता नागरिकांना नोटाबंदीचे दिवस आठवू लागले आहेत. लोकमत चमूच्या पाहणीदरम्यान, पैसे काढण्यासाठी भटकणारे अनेक नागरिक दिसून आले. चार-पाच एटीएम फिरल्यानंतरही पैसे मिळाले नाहीत, अशी त्यांची तक्रार होती.शहरातील बाजारपेठांच्या आसपास एटीएमची संख्या जास्त आहे. ग्राहकांच्या सोयीसाठी हे एटीएम लावण्यात आले होते. मात्र, बाजार परिसरातील एटीएममध्येही कॅश नाही. लोकमतने गांधीबाग, गोळीबार चौकातील एटीएमची पाहणी केली असता, येथे दोन्ही राष्ट्रीयीकृत बँकेच्या एटीएममध्ये पैसे नसल्याचे आढळून आले. एसबीआयच्या एटीएममधून एक व्यक्ती बाहेर पडला. त्याने हातातील पावती दाखवीत कॅश नसल्याचे सांगितले. याच चौकातील दुसºया एटीएमसमोर कॅश उपलब्ध नसल्याचा बोर्ड लागला होता. गोळीबार चौकातील अन्य दोन एटीएमही बंद होते. नंगा पुतळा चौकात यूबीआयच्या दोन एटीएमपैकी एकामध्ये रोख उपलब्ध नव्हती. छावणीच्या अचरज टाऊन चौकातील एका राष्ट्रीय बँकेच्या एटीएममध्ये प्रवेश करताच तेथे तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकाने कॅश नसल्याचे सांगितले. फ वारा चौक, नंदनवन, मेडिकल चौक, धंतोली येथीलही बहुतांश एटीएम बंद आढळले.२०० च्या नोटांचे दर्शनच नाही
नागपुरातील एटीएममध्ये ठणठणाट !!!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 11:31 PM
देशातील इतर राज्यांप्रमाणेच नागपूरच्या विविध भागातही एटीएममधून पैसे निघत नाहीत. पैसे काढण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांना एका एटीएमकडून दुसऱ्याकडे भटकावे लागत आहे. कुठेच पैसे मिळत नसल्याने लोक त्रस्त झाले आहेत.
ठळक मुद्देपैसे निघत नसल्याने नागरिक त्रस्त : ‘नो कॅश’चे बोर्ड लागले