नागपूर, दि. 6 : घरात सामान घेण्यासाठी आलेल्या महिलेवर शेजा-याने बलात्कार करून नंतर तिच्यावर विषप्रयोग केला. गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भिवसनखोरीत शनिवारी दुपारी ही खळबळजनक घटना घडली. महिलेच्या पतीने तक्रार दिल्यानंतर शनिवारी रात्री गिट्टीखदान पोलिसांनी आरोपी नंदू विठ्ठल उईके (वय ३०) याला अटक केली.पीडित महिला (वय ३५) तिच्या पतीसह भिवसनखोरीत राहतो. तिचा पती मिस्त्रीकाम करतो. आरोपी नंदू उईके बाजुलाच राहतो. त्यामुळे त्याचे आणि महिलेचे एकमेकांच्या घरी जाणे-येणे आहे. शनिवारी दुपारी १ च्या सुमारास पीडित महिला नंदूच्या घरी सामान आणण्यासाठी गेला. दारूच्या नशेत टून्न असलेल्या नंदूने तिच्यासोबत शरिरसंबंध जोडले. त्यानंतर तिच्यासोबत अनैसर्गिक कृत्य केले. या प्रकारामुळे पीडित महिला संतापली. तिचा नंदूसोबत जोरदार वाद झाला. त्यानंतर नंदूच्या घरातून ती ओका-या करीतच बाहेर पडली. तिची प्रकृती खालावल्यामुळे शेजा-यांनी तिला बाजुच्या खासगी रुग्णालयात नेले. हा प्रकार पतीला कळल्यानंतर त्यांनी गिट्टीखदान ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलीस उपनिरीक्षक एस. एल. वाकडे यांनी आरोपी नंदूविरुद्ध बलात्कार तसेच अनैसर्गिक कृत्य करून महिलेला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला. त्यानंतर धावपळ करून आरोपीला अटक केली.--विष दिले की घेतले ?पोलिसांनी त्याला या संबंधाने विचारणा केली असता आमचे तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. शरिरसंबंधानंतर तिनेच विष प्राशन केले, असे त्याने पोलिसांना सांगितले. आज नंदूला कोर्टात हजर करून पोलीस त्याचा पीसीआर घेणार आहे. पीडित महिलेची प्रकृती गंभीर असल्याचे पोलीस सांगतात.