लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्वच्छता सर्वेक्षण २०१८ मध्ये नागपूरला ‘इनोव्हेशन अॅण्ड बेस्ट प्रॅक्टीसेस’चा पहिला क्रमांक घोषित करण्यात आला आहे. स्वच्छता कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी मनपाने ‘जीपीएस घड्याळी’चा उपक्रम राबविला होता. याची ट्रायल आसीनगर झोनमध्ये करण्यात आली होती. केंद्रातून आलेल्या स्वच्छता सर्वेक्षणाच्या चमूला हा उपक्रम अतिशय आवडला होता. त्याच्या भरवशावरच दहा लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरामध्ये नागपूरला इनोव्हेशन अॅण्ड बेस्ट प्रॅक्टीसेसचा अवॉर्ड प्रदान करण्यात आला.विशेष म्हणजे यंदा देशभरातील ४३०२ शहरांमध्ये स्वच्छता सर्वेक्षण करण्यात आले होते. गेल्यावर्षी मात्र केवळ ४३४ शहरांमध्येच हे सर्वेक्षण झाले होते. यावर्षी शहरांची यादी क्रमानुसार जाहीर न करता कॅटेगरी व झोनच्या आधारावर वेगवेगळ्या श्रेणीमध्ये पुरस्कार प्रदान करण्यात आले. तत्कालीन मनपा आयुक्त व सध्याचे जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी स्वच्छता सर्वेक्षणादरम्यान अतिशय परिश्रम घेतले होते. ५० हजाराच्या जवळपास लोकांनी स्वच्छता अॅप डाऊनलोड केले होते. डोअर टू डोअर कचरा कलेक्शनपासून तर रेल्वे, बस स्टॅँडपर्यंतची स्वच्छता सर्वेक्षणादरम्यान करण्यात आली होती.एकूण शहरांच्या यादीमध्ये यंदा टॉप थ्री शहरांची यादी जाहीर करण्यात आली आहे. इंदूरला सलग दुसऱ्या वर्षी सर्वात स्वच्छ शहर म्हणून घोषित करण्यात आले. भोपाळ दुसऱ्या
जीपीएस घड्याळीने नागपूर ठरले अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 12:07 AM
स्वच्छता सर्वेक्षण २०१८ मध्ये नागपूरला ‘इनोव्हेशन अॅण्ड बेस्ट प्रॅक्टीसेस’चा पहिला क्रमांक घोषित करण्यात आला आहे. स्वच्छता कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी मनपाने ‘जीपीएस घड्याळी’चा उपक्रम राबविला होता. याची ट्रायल आसीनगर झोनमध्ये करण्यात आली होती. केंद्रातून आलेल्या स्वच्छता सर्वेक्षणाच्या चमूला हा उपक्रम अतिशय आवडला होता. त्याच्या भरवशावरच दहा लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरामध्ये नागपूरला इनोव्हेशन अॅण्ड बेस्ट प्रॅक्टीसेसचा अवॉर्ड प्रदान करण्यात आला.
ठळक मुद्देस्वच्छता सर्वेक्षणात मनपाला मिळाले यश‘इनोव्हेशन’मध्ये पहिला क्रमांक