लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सिव्हिल एव्हिएशनच्या दृष्टीने नागपूर महत्त्वाचे ठिकाण असून विमान वाहतूक ३० टक्क्यांनी वाढत आहे. वेगाने विकास होणारे नागपूर जीएटीमुळे देशाचे लॉजिस्टिक हब बनू शकते, असे प्रतिपादन महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले.मिहान-सेझ येथील एअर इंडियाच्या एमआरओमध्ये रविवारी आयोजित स्पाईसजेट विमानांच्या दुरुस्तीच्या शुभारंभाप्रसंगी ते बोलत होते. सर्वप्रथम त्यांनी नारळ फोडून कामाचा शुभारंभ केला.व्यासपीठावर केंद्रीय भूपूष्ठ रस्ते वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री अशोक गजपती राजू आणि प्रमुख अतिथी म्हणून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, स्पाईसजेट एअरलाईन्सचे चेअरमन अजय सिंह, एअर इंडियाचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक अश्विनी लोहानी, एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्व्हिसेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी एच.आर. जगन्नाथ यांच्यासह संसद कृपाल तुमाने, अमृता फडणवीस, एमएडीसीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सुरेश काकाणी, आ. गिरीश व्यास, आ. सुधाकर देशमुख, आ. आशिष देशमुख, आ. सुधाकर कोहळे, विभागीय आयुक्त अनुपकुमार आणि जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निशा सावरकर उपस्थित होते.मुख्यमंत्री म्हणाले, नागपुरात डिस्ट्रिब्युशन चेन स्थापन होत आहे. स्पर्धा वाढल्यानंतर पाच वर्षांनंतर नागपुरात कार्गोकरिता जागा राहणार नाही. त्यामुळे स्पाईसजेटने नागपूरला कार्गो बेस बनवून देश-विदेशातील कार्गोची वाहतूक करावी. त्यासाठी मदत करण्याचे त्यांनी आश्वासन दिले. बोर्इंग एअरक्राफ्ट फिनिशिंग स्कूल नागपुरात स्थापन करण्यास सरकार मदत करणार आहे. यासाठी केंद्रानेही पुढाकार घ्यावा. स्वागतपर भाषण जगन्नाथ यांनी केले. आभार एमआरओचे महाव्यवस्थापक एस.एस. काजी यांनी केले.स्वस्त होणार विमानांची सर्व्हिसिंगनितीन गडकरी म्हणाले, बोर्इंग विमानांच्या दुरुस्तीसाठी सिंगापूरला जावे लागत होते. परंतु बोर्इंगच्या मदतीने याठिकाणी हे केंद्र सुरू करण्यात आले आहे. आता स्पाईसजेट आणि पुढे अन्य कंपन्या विमान दुरुस्तीसाठी येतील. त्यामुळे केंद्राचा विस्तार आवश्यक आहे. स्थानिकांनाच रोजगार पुरविल्यास या केंद्राचा नागपूरकरांना लाभ होईल. नागपूरचे हवाई क्षेत्र हे खुले आहे. त्यामुळे विमान कंपन्यांनी रात्रीच्या वेळी याठिकाणी विमान थांबवावेत, तसेच याठिकाणाहून इतर ठिकाणी सेवा पुरवावी. एअर ट्रॉफिक सेंटरला अत्याधुनिक तंत्रज्ञान पुरवून त्याचा क्षमता विकास करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. सप्टेंबरमध्ये जपानहून सी-प्लेनच्या पाहणीसाठी चमू येत असल्याचे ते म्हणाले.
जीएसटीमुळे लॉजिस्टिक हब बनणार नागपूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 1:15 AM
सिव्हिल एव्हिएशनच्या दृष्टीने नागपूर महत्त्वाचे ठिकाण असून विमान वाहतूक ३० टक्क्यांनी वाढत आहे.
ठळक मुद्देदेवेंद्र फडणवीस : एमआरओमध्ये स्पाईसजेट विमानांच्या दुरुस्तीचा शुभारंभ