आनंद शर्मा ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : धावपळीच्या जीवनात आपल्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबई-पुणे येथील प्रॉपर्टीमध्ये गुंतवणुकीचे नियोजन करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी आता नागपूर पहिली पसंती ठरत आहे. मुंबई-पुणे येथे गुंतवणूकदारांची निराशा होण्याचे एकीकडे अनेक कारणे आहेत तर दुसरीकडे नागपुरात गुंतवणुकीची अनेक कारणे सांगितली जात आहेत.पुढील दिवसात नागपूर एक प्रॉपर्टी मार्केट म्हणून वेगाने पुढे येईल, असे रिअल इस्टेट क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे. त्यांच्यानुसार मुंबई-पुणे येथे प्रॉपर्टीचे दर सर्वाधिक आहेत तर ट्रॉफिक कंजेशनसह अन्य समस्यांच्या कारणांनी आता गुंतवणूकदारांचा नागपूरकडे कल वाढण्याचे संकेत मिळत आहेत. सद्यस्थितीत मुंबई-पुणे येथे कोविड-१९ संक्रमण वेगाने पसरत असल्याने नागपुरात रिअल इस्टेट क्षेत्राला बूस्ट मिळण्याची अपेक्षा या क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केली.नागपुरात दर्जेदार बांधकामाच्या प्रॉपर्टीच्या अनेक किफायत रेंज उपलब्ध असल्याचे जाणकारांचे मत आहे. येथे हिरवळ जास्त आणि प्रदूषणाचा स्तर कमी आहे.
लॉकडाऊनमध्ये प्रॉपर्टीची विचारपूस वाढलीलॉकडाऊनमध्ये मुंबई-पुणे येथील लोकांकडून नागपुरात प्रॉपर्टीची विचारपूस वाढली आहे. वर्क फ्रॉम होमच्या कल्चरने नागपुरात प्रॉपर्टी मार्केटला पुढील दिवसात बूस्ट मिळेल. येथे ट्रॅफिक आणि प्रदूषणाची समस्या नाहीच. प्रॉपर्टीचे दर तुलनात्मकरीत्या कमी आहेत. त्याचा फायदा मुंबई-पुणे येथे कार्यरत नागपुरातील लोकांना होत आहे.- महेश साधवानी,अध्यक्ष, क्रेडाई नागपूर मेट्रो.
आरोग्याच्या दृष्टीनेही सर्वोत्तम पर्यायसध्याच्या टप्प्यात मुंबई-पुणेच्या तुलनेत नागपूर आरोग्य आणि प्रॉपर्टीत गुंतवणुकीच्या दृष्टीने सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. येथे मेट्रो रेल्वे, काँक्रिट रोड यासारख्या सुविधा आहेत. वर्क फ्रॉम होम कल्चरमुळे गुंतवणूक वाढेल. मिहानमध्ये कंपन्यांना आकर्षित केल्याने येथे रोजगार वाढेल.- राजेंद्र (निर्मल कुमार) आठवले, माजी अध्यक्ष,बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया (महाराष्ट्र).सवलतींमुळे बूस्टकोविड-१९ नंतर नागपूरचे रिअल इस्टेट क्षेत्र वेगाने पुढे वाढणार आहे. मुंबई-पुणे येथे कार्यरत नागपुरातील अधिकाधिक लोकांनी नागपुरात प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करावी, याकरिता सरकारतर्फे स्टॅम्प ड्युटी आणि रेडिरेकनरच्या दरात कपात करावी. यामुळे महसूल वाढीसह रिअल इस्टेट क्षेत्राला बूस्ट मिळेल.- अभिजित मजुमदार, एमडी, अभिजित रियलेटर्सअॅण्ड इन्फ्राव्हेंचर्स प्रा.लि.
किफायत दरात मिळणार प्रॉपर्र्टीसुरक्षा, प्रदूषण, ट्रॅफिक कंजेशनच्या दृष्टीने नागपूरची स्थिती सर्वोत्तम आहे. दर मुंबई, पुणेच्या तुलनेत किफायत आहेत. मुंबई आणि पुणे येथील लोक वर्क फ्रॉम होम कल्चरमुळे नागपुरात प्रॉपर्टी घेऊन येथून काम करीत आहेत. सर्वोत्तम एअर, रेल्वे, रोड कनेक्टिव्हिटीमुळे ते एक-दोन आठवड्यात मुंबई, पुणे येथील कार्यालयात जाऊ शकतात.- अभय जोशी, संचालक,लक्ष्मी केशव कन्स्ट्रक्शन्स.