शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मविआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

नागपुरात बोट, लाईफ जॅकेट, जवान तयार : आपत्ती व्यवस्थापनासाठी प्रशासन सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2019 12:12 AM

पावसाला सुरुवात झाली असून जिल्ह्यात कुठलीही नैसर्गिक आपत्ती आल्यास त्याचा सामना करण्यासाठी आणि लोकांच्या मदतीसाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे. पाण्यात अडकलेल्या लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी बोट, लाईफ जॅकेटसह एसडीआरएफचे १५० जवान तयार आहेत.

ठळक मुद्देप्रत्येक तालुक्यात शोध बचाव पथक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पावसाला सुरुवात झाली असून जिल्ह्यात कुठलीही नैसर्गिक आपत्ती आल्यास त्याचा सामना करण्यासाठी आणि लोकांच्या मदतीसाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे. पाण्यात अडकलेल्या लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी बोट, लाईफ जॅकेटसह एसडीआरएफचे १५० जवान तयार आहेत.२००५ च्या आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तयार करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी हे या प्राधिकरणाचे अध्यक्ष असतात. तालुका स्तरावरही ही समिती कार्यरत असते. प्राधिकरण हे वर्षभर कार्यरत असते. परंतु मान्सूनच्या काळात विशेष काळजी घेतली जाते. आपत्ती व्यवस्थापन हे केवळ एका विभागाचे काम नाही. प्रत्येक विभागाच्या सहकार्याने याचे नियोजन केले जाते. त्यामुळे प्रत्येक विभागाचेच यात मोलाचे सहकार्य असते. आपत्तीच्या काळात विभागांचे नेमके नियोजन कसे असावे, यासाठी प्रत्येक विभागातील अधिकऱ्यांचे प्रशिक्षण केले जाते. हे प्रशिक्षण पार पडले आहे. यामध्ये आपत्ती आल्यास विभागांनी नेमके काय करवे, त्या-त्या विभागाची काय जबाबदारी राहील, याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. याकाळात विशेषत: जनजागृतीवर अधिक भर दिला जात आहे. महापालिकेचा अग्निशमन विभाग, रेड क्रॉस सोसायटी आणि एसडीआरएफ यांनी अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे.जिल्ह्यातील आपत्तीचा सामना करण्यासाठी सध्या ३ बोटी, १५० लाईफ जॅकेट, १५० लाईफ बॉय, २२ इन्फाटेबल लाईट ही प्रमुख सामुग्री आहे. यासोबतच आवश्यक इतर लहानसहान वस्तूही आहेत. ही सामुग्री पुरेशी आहे. यासोबतच एसडीआरएफचे (स्टेट डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स) १५० जवान तैनात आहेत. एसडीआरएफच्या २२ ते २३ टीम तयार करण्यात आल्या आहेत. ही टीम अतिशय प्रशिक्षित असल्याने कुठल्याही आपत्तीचा सामना करण्यास सज्ज आहे. यासोबतच नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्सचीही एक टीम तैनात राहणार आहे.शालेय विद्यार्थ्यांना प्रशिक्षणआपत्ती व्यवस्थापनाचा सामना करण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक असते. त्यामुळे जिल्हा आपत्ती व्यवस्थान केंद्राद्वारे नागपुुरातील विविध शाळांमधील मुलांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. यामध्ये एखादी नैसर्गिक आपत्ती निर्माण झाल्यास काय करायला हवे, याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.२४ तास सुरू राहणार नियंत्रण कक्षजिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्ष स्थापित करण्यात आले आहे. ते सातही दिवस २४ तास सुरू राहील. यासाठी तिन्ही पाळ्यातील कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात आली आहे. सुटीच्या दिवशीही हे केंद्र सुरू राहील. तशी कर्मचाºयांची ड्युटी लावण्यात आली आहे. या नियंत्रण कक्षाचा टोल फ्री क्रमांक १०७७ आहे. तर ०७१२-२५६२६६८ हा या नियंत्रण कक्षाचा क्रमांक आहे. कुठलाही कॉल आला तर संबंधितांना लगेच कळविले जाते. त्यामुळे तातडीने कारवाई शक्य होईल, असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अंकुश गावंडे यांनी सांगितले.प्रत्येक तालुकास्तरावर शोध बचाव पथकप्रत्येक तालुका व महत्त्वाच्या ठिकाणी शोध बचाव पथक सज्ज ठेवण्यात आले आहे. यामध्ये चांगले पोहता येणारे लोक, होमगार्ड यांचा समावेश आहे. प्रत्येक तालुक्यात जवळपास ३० लोकांचे पथक असून गावपातळीवर ५ ते १० जणांचे पथक आहे.

 

टॅग्स :floodपूरNagpur Collector Officeनागपूर जिल्हाधिकारी कार्यालय