- सुमेध वाघमारे नागपूर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर हॉस्पिटल व रिसर्च सेंटरने (आरएसटी) नुकतेच महिलांमधील स्तन कर्करोगाची आकडेवारी जाहीर केली. त्यात नागपूर व परिसरातील महिलांचा एकूण कॅन्सरमध्ये पहिल्या क्रमांकांवर स्तनाचा कर्करोग असल्याचे पुढे आले आहे.
‘आरएसटी’ कॅन्सर हॉस्पिटलचे संचालक डॉ.करतार सिंग, मानद सल्लागार डॉ. बी.के. शर्मा, इएनटी आॅन्कोसर्जन डॉ. अनिरुद्ध वाघ, डॉ. रेवू शिवकला आणि कर्करोग नोंदणी विभागाच्या अधिकाºयांनी ही आकडेवारी सादर केली. डॉ. शर्मा म्हणाले, २०२०मध्ये, जगभरात २.३ दशलक्ष महिलांना स्तनाच्या कर्करोगाचे निदान झाले त्यापैकी ६,८५,००० रुग्णांचे मृत्यू झाले. स्त्रियांमध्ये आढळलेल्या कर्करोगांपैकी स्तनाचा कर्करोगाचे प्रमाण सुमारे ३०टक्के होते. ‘ग्लोबोकॅन डेटा’ २०२०च्या अभ्यासानुसार भारतात दर पाच मिनीटांमध्ये एक महिलामध्ये स्तन कर्करोागचे निदान होते.
५२ हजार महिलांमध्ये संशयित कॅ न्सरआरोग्य विभागाच्यावतीने २०२२मध्ये झालेल्या ‘मात सुरक्षीत तर घर सुरक्षीत’ या मोहिमेंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रात ५२ हजारांपेक्षा जास्त महिलांना संशयित स्तनाचा कर्करोग आणि इतर प्रकारच्या कर्करोगाचे निदान झाले.
‘आरएसटी’ कॅन्सर हॉस्पिटलमध्ये स्तन कर्करोगाचे सर्वाधिक रुग्ण‘आरएसटी’ कॅन्सर हॉस्पिटलमध्ये, महिलांमध्ये स्तनाचा कर्करोगाच्या रुग्णांची संख्या मोठी आहे. हॉस्पिटलच्या २०१९-२१च्या आकडेवारीनुसार, गेल्या तीन वर्षात ८ हजार ५३ कर्करोगाच्या एकूण प्र्रकरणांपैकी १ हजार १२५ स्तनाचा कर्करोगाचे रुग्ण आढळले, जे एकूण कर्करोगाच्या १४ टक्के आहे. स्तनाच्या कर्करोगाचे बहुतेक रुग्ण ४१ ते ५० वयोगटातील (३४ टक्के) आहेत, त्यानंतर ५१ ते ६० वयोगटातील (२५ टक्के) आणि ३१ ते ४० वयोगटातील (१९ टक्के) आहेत.
२९ पैकी एका महिलेला स्तन कर्करोागचा धोका‘आयसीएमआर’चे संचालक डॉ. प्रशांत माथूर यांनी २०२२ मध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासानुसार, २९ पैकी एका महिलेला तिच्या आयुष्यात स्तनाचा कर्करोग होण्याचा धोका असतो. स्त्रियांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण एकूण कर्करोगापैकी २.० लाख (१४.८ टक्के) असल्याचा अंदाज आहे.