शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
3
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
4
"बटेंगे तो कटेंगे भाषा महाराष्ट्रात नाही चालणार"; सुप्रिया सुळेंचे भाजपवर टीकास्त्र
5
"तुम्ही तर कधी तिरंगाही कधी लावत नव्हता"; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

नागपुरात औरंगाबादच्या व्यावसायिकाचे २४ लाख हडपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2019 3:29 PM

औरंगाबाद (बिहार) च्या एका व्यावसायिकाच्या नावाने बनावट धनादेश तयार करून त्या एका टोळीने आधारे पंजाब नॅशनल बँकेच्या मानकापूर शाखेतून २३ लाख, ७० हजार रुपये लंपास केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.

ठळक मुद्देबनावट चेकचा वापरखातेधारकासोबत बँकेचीही फसवणूक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : औरंगाबाद (बिहार) च्या एका व्यावसायिकाच्या नावाने बनावट धनादेश तयार करून त्या एका टोळीने आधारे पंजाब नॅशनल बँकेच्या मानकापूर शाखेतून २३ लाख, ७० हजार रुपये लंपास केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. बँकेतर्फे देण्यात आलेल्या तक्रारीची प्रदीर्घ चौकशी केल्यानंतर मानकापूर पोलिसांनी गुरुवारी रात्री या प्रकरणात सहा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. सागर कोहळे (रा. मानकापूर) असे या प्रकरणातील मुख्य आरोपीचे नाव असून, अन्य आरोपींमध्ये स्वप्नील सुभाष, श्वेता पुष्पकुमार हजारे, बरबटे आॅटोमोटीव्ह प्रा. लिमिटेड, नितीन नारायण निखाडे, ज्योतीराम देव आणि त्यांच्या साथीदारांचा समावेश आहे.पंजाब नॅशनल बँकेच्या मानकापूर शाखेत आरोपी सागर कोहळे याचे खाते आहे. पीएनबी औरंगाबादचे खातेधारक संजयकुमार सिंग यांचा १२ एप्रिलचा धनादेश १६ एप्रिलला कोहळेने त्याच्या खात्यात जमा केला. २३ लाख, ७० हजारांचा धनादेश असल्यामुळे बँक अधिकारी शितल विनोद खुळसाम (वय ३७) यांनी तो वटविण्यापूर्वी आरोपी सागर कोहळेशी संपर्क केला. त्याने दिलेल्या मोबाईलनंबरवर सिंग यांच्याशी संपर्क केला. दोन्ही कडून ना हरकत मिळाल्याने खुळसाम यांनी ही रक्कम सागर कोहळेच्या खात्यात जमा केली. २५ एप्रिलला पीएनबी औरंगाबादच्या बिहार शाखेकडून मानकापूर बँक शाखेला एक मेल मिळाला. त्यात त्यांचे खातेधारक संजयकुमार सिंग यांच्या खात्यातून २३ लाख, ७० हजारांची रक्कम काढण्यासाठी जी रक्कम काढली गेली तो धनादेश आणि त्यावरच्या सह्या बनावट असल्याचे बिहारमधील बँक अधिका-यांनी कळविले. ज्या क्रमांकाचा धनादेश आहे, तो धनादेशही (ओरिजनल) सिंग यांच्याकडेच आहे, असेही तेथील अधिका-यांनी पीएनबी मानकापूरच्या अधिका-यांना कळविले. त्यामुळे स्थानिक बँकेच्या अधिका-यांची चांगलीच तारांबळ उडाली. बँकेतर्फे शितल खुळसाम यांनी मानकापूर पोलिसांकडे तक्रार दिली. ठाणेदार वजिर शेख यांनी त्याची चौकशी केल्यानंतर गुरुवारी रात्री या प्रकरणी गुन्हा दाखल केला. रात्रीच सागर मोहोळला अटक करण्यात आली. पुढील तपास सुरू आहे.तीन दिवसात पैशाची वाटणीआरोपी कोहळेच्या खात्यात १६ एप्रिलला रक्कम जमा होताच १६, १७ आणि १८ एप्रिलला त्याने आणि त्याच्या साथीदारांनी आपल्या खात्यात रक्कम वळती करून घेतली. त्यातील सर्वाधिक १० लाखांची रक्कम निखाडे, ५ लाख हजारे, तर उर्वरित रक्कम बरबटे, सुभाष आणि देव यांच्या खात्यात वळती झाली. त्यामुळे पोलिसांनी त्यांनाही आरोपी बनविले असून, त्यांची या प्रकरणात काय भूमीका आहे, त्याचा शोध घेतला जात आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी