नागपूर : रामदासपेठेतील सेंटर बाजार रोडवर एका बहुमजली व्यवसायिक इमारतीच्या बांधकामाच्या ठिकाणी ४० फुट खोल खड्ड्यात सोमवारी रात्री कार पडली होती. हा परिसर रहिवाशी असल्याने निर्माणधीन इमारतीच्या शेजारी राहणाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच महापालिकेचे अग्निशमन अधिकारी बी.पी. चंदनखेडे हे पथकासह घटनास्थळी पोहचले होते.
मंगळवारी पहाटेपासूनच निर्माणधीन इमारतीच्या बिल्डरकडून खड्डा बुजविण्याचे काम सुरू झाले आहे. सकाळी ४० फुट खड्ड्यात पडलेली कार काढण्यात आली. या खड्ड्यामध्ये एक पोकलेन मशीन देखील फसलेली आहे. जेसीबीच्या सहायाने मशीनही काढण्यात येत आहे. या खड्ड्यामुळे गुरुद्वाऱ्याला लागून असलेला रस्ताही कोसळला होता. त्यामुळे सकाळपासून खड्डा भरण्याचे काम सुरू आहे. दुपारी २ वाजेपर्यंत किमान २०० ट्रक माती खड्ड्यात टाकण्यात आली होती. कुठलीही अनुचित घटना घडू नये म्हणून अग्निशमनचे पथक घटनास्थळी तैनात आहेत.