लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मध्य नागपुरात मतमोजणीदरम्यान भाजप आणि काँग्रेसमध्ये तुल्यबळ लढत पाहायला मिळाली. या लढतीत विकास कुंभारे सहजरीत्या विजयी होतील, असा राजकीय पंडितांचा अंदाज फोल ठरला. २२ फेऱ्यांपर्यंत चुरस बघायला मिळाली.विकास कुंभारे सन २०१४ मध्ये ३८,३०८ मतांनी विजयी ठरले होते. त्यावेळी विकास कुंभारे यांना ८७,४२३ आणि काँग्रेसचे अनिस अहमद यांना ४९,४५२ मते मिळाली होती. पण सन २०१९ मध्ये विजयी आकडा ३४,३०८ ने कमी होऊन ३,७६३ मतांवर आला. विकास कुंभारे यांना ७५,२७८ आणि बंटी शेळके यांना ७१,५२५ मते मिळाली आहेत.पहिल्या फेरीत बंटी शेळके यांनी १५२८ मतांची आघाडी घेताच काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला. बंटी शेळके यांना ४,२४४ आणि विकास कुंभारे यांना २७१६ मते मिळाली. काँग्रेस कार्यकर्त्यांचा उत्साह नंतरच्या चार फेºयांमध्ये ओसरला. दुसऱ्या फेरीत कुंभारेंनी ५,९१९ मते घेऊन २४५६ मतांची आघाडी घेतली. दुसºया फेरीपर्यंत भाजपला ८६३५ आणि काँग्रेसला ६,१७९ मते मिळाली. भाजपाची आघाडी घेण्याचा क्रम पाचव्या फेरीपर्यंत सुरू होता. पाचव्या फेरीपर्यंत कुंभारे यांनी ११,६३२ मतांची आघाडी घेतली. कुंभारेंना २३,४३६ आणि शेळके यांना ११,८०४ मते मिळाली. पण सहा ते नवव्या फेरीपर्यंत शेळके यांनी ८,००४ मतांची आघाडी भरून काढली. त्यानंतरही कुंभारे यांना ३०२५ मतांची आघाडी मिळाली होती. नवव्या फेरीत कुंभारे यांना २९,८२० आणि शेळके यांना २६,७९५ मते मिळाली. त्यानंतर १० ते १२ या तीन फेºयांमध्ये कुंभारे यांनी पुन्हा आघाडी घेतली. बाराव्या फेरीअखेर कुंभारेंची आघाडी वाढून ८,५५७ वर गेली. कुंंभारे यांना ४२,८०८ आणि शेळके यांना ३४,२६१ मते मिळाली. तेराव्या फेरीत पुन्हा शेळके यांनी १३९९ मतांची आघाडी कमी केली. या फेरीअखेर कुंभारे यांना ४५,२७४ आणि शेळके यांना ३८,११६ मते मिळाली. १४ व्या फेरीत कुंभारे यांना शेळके यांच्यापेक्षा ९३ तर १५ व्या फेरीत ९० मते जास्त मिळाली. त्यानंतर १६ आणि १७ व्या फेरीत कुंभारे यांना अनुक्रमे १३२२ आणि १२४७ मते जास्त मिळाली. १७ व्या फेरीअखेर कुंभारे यांना ६१,००६ आणि शेळके यांचे मताधिक्य ५१,३२६ वर गेले. या फेरीअखेर कुंंभारे ९,६८० मतांनी आघाडीवर होते. कुंभारेंना ६१,००६ आणि शेळके यांना ५१,३२६ मते मिळाली.खरी लढत १८ व्या फेरीनंतर बघायला मिळाली. नंतरच्या पाच फेऱ्यांमध्ये बंटी शेळके यांनी आघाडी घेत कुंभारे यांच्यावर मात करण्याचा प्रयत्न केला. कुंभारे यांची ९,६८० मतांची आघाडी कमी होऊ लागली. प्रत्येक फेरीनंतर भाजप कार्यकर्त्यांचा तणाव वाढत होता. शेळके यांना १८ व्या फेरीत ३४९, १९ व्या फेरीत १३२३, २० व्या फेरीत १८५४, २१ व्या फेरीत १२३९ आणि २२ व्या फेरीत ११६४ मते जास्त मिळाली. या पाचही फेºयांमध्ये शेळके यांना कुंभारेंपेक्षा एकूण ५,९२९ मते अधिक मिळाली. अखेरच्या पाचही फेऱ्यांच्या मतमोजणीदरम्यान भाजप कार्यकर्त्यांची धाकधूक वाढली होती. २२ व्या फेरीअखेर मतांची गोळाबेरीज करताना कुंभारे यांना ७५,१५० आणि शेळके यांना ७१,४०९ मते मिळाली. पोस्टल बॅलेटची बेरीज करताना कुंभारे यांना ७५,२७८ आणि शेळके यांना ७१,५२५ मते मिळाली. अखेर कुंभारे ३,७६३ मतांनी विजयी ठरले.पोस्टल बॅलेटने मतदानमध्य नागपुरात ३४८ पोस्टल बॅलेटने मतदान करण्यात आले. त्यात २५८ मते वैध तर ९० मते अवैध ठरली. यामध्ये कुंभारे यांना १२८ आणि शेळके यांना ११६ मते मिळाली. यातही दोन मतदारांनी नोटाला मतदान केले.एमआयएमने दाखविली ताकदमध्य नागपुरात एमआयएमने आपली ताकद दाखविली. उमेदवार अब्दुल शारिक पटेल यांनी पहिल्या फेरीतच ११३६ मते घेऊन आपली चुणूक दाखविली. सहाव्या फेरीत ९०७, सातव्या फेरीत ११८१, आठव्या फेरीत १९३८, नवव्या फेरीत १६०३ अशाप्रकारे पटेल यांना ८,५६० मते मिळाली.