लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - औषधे, पुस्तक आणि लिखानाचे साहित्य उपलब्ध करून दिले जात नसल्याच्या आरोपावरून प्रो. जी. एन. साईबाबाने येथील मध्यवर्ती कारागृहात उपोषण केल्याची चर्चा आहे.कारागृह प्रशासनाने मात्र त्याचा ईन्कार केला आहे. माओवादी कारवायात सहभागी असल्याच्या आरोपात साईबाबाला कारागृहात डांबण्यात आले आहे. येथे मुलभूत सुविधा उपलब्ध होत नसल्याची साईबाबाची तक्रार आहे. या पार्श्वभूमीवर त्याने २८ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबरपर्यंत कारागृहात उपोषण केल्याची चर्चा आहे. या संबंधाने संपर्क केला असता असे कोणतेही उपोषण कारागृहात झाले नसल्याचा खुलासा कारागृह अधीक्षक अनुप कुमरे यांनी दिली आहे.