नागपूर : प्रवाशांच्या सुविधेसाठी आणि वाढलेली प्रतीक्षायादी पाहून रेल्वे प्रशासनाने रेल्वेगाडी क्रमांक ०२०५० /०२०४९ /०२०४८ नागपूर-छत्रपती शिवाजी टर्मिनस-नागपूर दरम्यान फेस्टिव्हल स्पेशल रेल्वेगाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे प्रवाशांसाठी सुविधा झाली असून, त्यांना या गाडीत बर्थ उपलब्ध होणार आहेत.
रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानुसार, रेल्वेगाडी क्रमांक ०२०५० नागपूर-छत्रपती शिवाजी टर्मिनस साप्ताहिक सुपरफास्ट फेस्टिव्हल स्पेशल रेल्वेगाडी २७ डिसेंबर ते ३१ जानेवारी दरम्यान प्रत्येक रविवारी दुपारी ४.३० वाजता सुटेल. ही गाडी वर्धा ५.१८, बडनेरा ७.२७, मूर्तिजापूर ८.०३, अकोला ८.३५, शेगाव ९.१३ आणि छत्रपती शिवाजी टर्मिनसला दुसऱ्या दिवशी सकाळी ६.१५ वाजता पोहोचेल. रेल्वेगाडी क्रमांक ०२०४९ छत्रपती शिवाजी टर्मिनस-नागपूर साप्ताहिक सुपरफास्ट फेस्टिव्हल स्पेशल ही गाडी २५ डिसेंबर ते २९ जानेवारी दरम्यान आठवड्यातून एकदा प्रत्येक शुक्रवारी सायंकाळी ७.५५ वाजता छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून सुटेल. ही गाडी शेगावला दुसऱ्या दिवशी सकाळी ५.०८, अकोला ५.४५, मूर्तिजापूर ६.१८, बडनेरा ७.२२, वर्धा ८.५३ आणि नागपूरला १०.२५ वाजता पोहोचेल. रेल्वेगाडी क्रमांक ०२०४८ नागपूर-छत्रपती शिवाजी टर्मिनस सुपरफास्ट फेस्टिव्हल स्पेशल २४ डिसेंबरला सायंकाळी ६ वाजता सुटेल. ही गाडी वर्धा ७.०३, पुलगाव ७.२६, धामणगाव ७.४५, चांदूर ७.५९, बडनेरा ८.५७, मूर्तिजापूर ९.१९, अकोला ९.५७ आणि दुसऱ्या दिवशी छत्रपती शिवाजी टर्मिनसला सकाळी ७.४५ वाजता पोहोचेल. या गाड्यांचे आरक्षण २१ डिसेंबरपासून सुरू करण्यात आले आहे. या गाड्यात एकूण १८ कोच राहणार आहेत. यात २ द्वितीय वातानुकूलित, ५ तृतीय वातानुकूलित, ७ स्लिपर, २ साधारण द्वितीय आणि २ एसएलआर कोचचा समावेश आहे.
...............