नागपूर शहर काँग्रेस कार्यकारिणीत होणार फेरबदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 09:03 PM2019-06-13T21:03:08+5:302019-06-13T21:04:13+5:30

लोकसभा निवडणुकीतील पराभवावर मंथन करीत आगामी विधानसभेच्या निवडणुकीसाठी नव्याने कामाला लागण्याचा निर्धार गुरुवारी झालेल्या शहर काँग्रेस समितीच्या बैठकीत व्यक्त करण्यात आला. याचाच एक भाग म्हणून शहर काँग्रेस समितीत गेल्या अनेक वर्षांपासून काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या कामाचे पुनर्मूल्यांकन करून कार्यकारिणीत फेरबदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

In Nagpur City Congress Working Committee will be reshuffle | नागपूर शहर काँग्रेस कार्यकारिणीत होणार फेरबदल

नागपूर शहर काँग्रेस कार्यकारिणीत होणार फेरबदल

Next
ठळक मुद्देविधानसभेच्या पार्श्वभूमीवर तयारी : शहर काँग्रेसने घेतला आढावा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लोकसभा निवडणुकीतील पराभवावर मंथन करीत आगामी विधानसभेच्या निवडणुकीसाठी नव्याने कामाला लागण्याचा निर्धार गुरुवारी झालेल्या शहर काँग्रेस समितीच्या बैठकीत व्यक्त करण्यात आला. याचाच एक भाग म्हणून शहर काँग्रेस समितीत गेल्या अनेक वर्षांपासून काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या कामाचे पुनर्मूल्यांकन करून कार्यकारिणीत फेरबदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
काँग्रेसच्या शहर कार्यकारिणीची बैठक अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली देवडिया काँग्रेस भवनात गुरुवारी झाली. बैठकीला प्रदेश चिटणीस अतुल लोढे, अ‍ॅड अभिजीत वंजारी, शेख हुसैन, माजी आमदार यशवंत बाजीराव, माजी महापौर नरेश गांवडे आदी उपस्थित होते. यावेळी विकास ठाकरे म्हणाले, काँग्रेसची ताकत वाढली आहे. गेल्यावेळीपेक्षा १ लाख ४१ हजार मते जास्त मिळाली आहेत. संघटनेने लोकसभा उमेदवारांच्या पूर्णपणे पाठीशी राहून चांगले काम केलेले आहे. परंतु विधानसभेचा विचार करता बूथनिहाय बांधणी करणे गरजेचे आहे. यावेळी सहाही विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला मिळालेली मते, आघाडी- पिछाडीची कारणे आदींचा आढावा घेण्यात आला.
विधानसभेसाठी निवडणूक समिती नेमणार
विधानसभा निवडणुकीसाठी प्रत्येक मतदारसंघनिहाय निवडणूक समितीची स्थापना केली जाईल. प्रत्येक पदाधिकाऱ्यांना बूथ प्रमुखाची जबाबदारी सोपविली जाईल. बूथचे ए,बी व सी असे वर्गीकरण केले जाईल. तसेच निष्क्रिय बूथ अध्यक्ष व ब्लॉक अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांना बदलण्याची प्रक्रियादेखील करण्यात येईल, असे शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनी बैठकीत स्पष्ट केले. विधानसभानिहाय मेळावे, प्रभागनिहाय शिबिर, बूथनिहाय आखणी करण्याचे निश्चित करण्यात आले.
झेपत नसेल तर पदमुक्त व्हा !
काँग्रेस पक्षामध्ये ब्लॉक अध्यक्ष महत्त्वाचा घटक आहे. ज्या ब्लॉक अध्यक्षांना आपली जबाबदारी झेपत नसेल त्यांनी इतरांना संधी देत ब्लॉक अध्यक्षांची जबाबदारी सोपवावी. अनेक पदाधिकारी आपापल्या पदानुसार जबाबदारी घेत नाही. याचा फटका पक्षाला बसतो. नव्या जोमाने कामाला लागायचे असेल तर स्वागत आहे नाही तर पदमुक्त व्हा, अशा शब्दात ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांचे कान टोचले. यावेळी प्रत्येक विधानसभा क्षेत्रातील ब्लॉक अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांना आपले मत मांडण्याची संधी देण्यात आली.

Web Title: In Nagpur City Congress Working Committee will be reshuffle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.