शहरं
Join us  
Trending Stories
1
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
3
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
4
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
5
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
6
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
7
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
8
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
9
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
10
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
11
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
12
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
13
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
14
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
15
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
16
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
17
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
18
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
19
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
20
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती

नागपुरात वाडीचे नगराध्यक्ष प्रेमनाथ झाडे एसीबीच्या जाळ्यात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2019 1:03 PM

एका खासगी संस्थेच्या तीन अभियंत्याचे वेतन काढून देण्यासाठी २४  हजारांची लाच मागून त्यापैकी २० हजारे रुपये स्विकारणारे भाजपचे नेते आणि वाडी नगर परिषदेचे नगराध्यक्ष प्रेमनाथ झाडे यांनी शुक्रवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच स्वीकारताना रंगेहात पकडले.

ठळक मुद्देमालमत्तेची चौकशी सुरूघरातच स्विकारली लाचेची रक्कम वाडीत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ 

नागपूर::लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर (वाडी) : वाडी नगर परिषदेत काम करणाऱ्या एका खासगी संस्थेच्या तीन अभियंत्याचे वेतन काढून देण्यासाठी २४  हजारांची लाच मागून त्यापैकी २० हजारे रुपये स्विकारणारे भाजपचे नेते आणि वाडी नगर परिषदेचे नगराध्यक्ष प्रेमनाथ झाडे यांनी शुक्रवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.वाडी नगर परिषदेत पुरवठादार संस्थेने  तीन स्थापत्य अभियंत्याचा पुरवठा केला होता. त्यांचे चार महिन्यांचे वेतन काढून देण्यासाठी संस्थेच्या संचालकाकडे झाडे यांनी २४ हजार रुपयाच्या लाचेची मागणी केली होती. संस्थेने या संदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला १६ मे रोजी तक्रार दिली होती. एसीबीच्या अधिका-यांनी रचलेल्या सापळ्यानुसार, संस्थाचालक आणि झाडे यांच्यात २० हजार रुपये लाच देण्याचे निश्चित करण्यात आले. त्यानुसार लाचेची रक्कम घेऊन तक्रारदार झाडे यांच्याकडे शुक्रवारी सकाळी १० वाजता पोहचले. त्यांच्याकडून झाडे यांनी लाचेची रक्कम स्विकारताच बाजुलाच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने झाडेंना रंगेहात पकडले. वाडीचे नगराध्यक्ष लाच घेताना पकडले गेल्याचे कळाल्याने जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे. कारवाईनंतर झाडे यांना लाचलुचप प्रतिबंधक विभागाच्या नागपूर येथील कार्यालयात आणण्यात आले. वृत्त लिहिस्तोवर अधिकारी त्यांची चौकशी करीत होते. 

 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी