लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत नागपूर शहरात ३८०० पैकी ३५०० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. या प्रकल्पाची चाचणी घेतली जात आहे. कार्यान्वित करण्यात आलेल्या कॅमेऱ्यांंचा डाटा संकलित केला जात आहे. काही दिवसातच हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होणार असून शहर सीसीटीव्हीच्या देखरेखीत येणार आहे.शासनाचा माहिती व तंत्रज्ञान विभाग, महापालिका व पोलीस विभाग संयुक्तपणे हा प्रकल्प राबवित आहे. ५२० कोटींचा हा प्रकल्प असून स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या माध्यमातून या प्रकल्पाची अंमलबजावणी केली जात आहे. एल अॅन्ड टी कन्स्ट्रक्शन यांच्याकडे या प्रकल्पाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. १८ आॅक्टोबर २०१६ पर्यंत पूर्ण करावयाचा होता. मात्र निर्धारित कालावधीत हा प्रकल्प पूर्ण झाला नाही. यात अनेक अडचणी आल्या. मेट्रो रेल्वेसह शहरात सुरू असलेल्या विकास कामांचाही यात अडथळा आला.या प्रकल्पाच्या माध्यमातून शहरातील प्रमुख रस्ते, चौक सीसीटीव्हीच्या देखरेखीत आले आहे. याचा शहर पोलिसांना उपयोग होणार आहे. तसेच वाहतूक नियंत्रणासाठी या प्रकल्पाची मदत होणार आहे. चौकात सिग्नल तोडणाºयांवर कारवाई करणे शक्य होणार आहे.सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांना गुन्ह्यांचा तपास करण्याला मदत होत आहे. यामुळे गुन्हेगारीला आळा बसण्याला मदत होणार आहे. शहरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे सर्व्हरशी जोडण्यात आले असून डाटा संकलित केला जात आहे. महापालिका मुख्यालयातील कक्षासोबत जोडण्यात आले आहे. तसेच पोलीस मुख्यालयात कंट्रोल रुम उभारण्याचे काम सुरू आहे.प्रकल्पाचे लवकरच उद्घाटननागपूर शहरात ३८०० पैकी ३५०० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. या प्रकल्पाची चाचणी घेतली जात आहे. लवकरच या प्रकल्पाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याहस्ते उद्घाटन करण्याचा प्रयत्न आहे.डॉ. रामनाथ सोनवणे, मुख्य कार्यकारी अधिकारी एनएसएससीडीसीएल
नागपूर शहर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांंच्या नजरेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 11:02 PM
स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत नागपूर शहरात ३८०० पैकी ३५०० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. या प्रकल्पाची चाचणी घेतली जात आहे. कार्यान्वित करण्यात आलेल्या कॅमेऱ्यांंचा डाटा संकलित केला जात आहे. काही दिवसातच हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होणार असून शहर सीसीटीव्हीच्या देखरेखीत येणार आहे.
ठळक मुद्देप्रकल्प अंतिम टप्प्यात : ३८०० पैकी ३५०० कॅमेरे कार्यान्वित