लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागरिकांना मूलभूत सोई पुरविण्यात कोणतीही अडचण होता कामा नये, यासाठी एकच विकास संस्था ठेवण्यात येणार आहे. ती म्हणजे महापालिका. महापलिका हीच शहरातील एकमेव प्लॅनिंग अॅथोरिटी राहील. नागपूर सुधार प्रन्यासकडे असलेल्या सर्व जागा आणि ले-आऊट महानगरपालिकेकडे हस्तांतरित होणार आहे, लवकरत ही कार्यवाही पूर्ण होणार असल्याची माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.नागपूर सुधार प्रन्यास बरखास्त करण्याची घोषणा भाजपकडून करण्यात आली होती. याची सुरुवात म्हणून काही ले-आऊट महानगरपालिकेकडे हस्तांतरितही करण्यात आले. मात्र नागपूर सुधार प्रन्यासकडे असलेल्या खुल्या जागा आणि प्रोजेक्ट महापालिकेला देण्यास विरोध दर्शविण्यात आला. यावर तोडगा काढण्यासाठी नगर विकास विभागाच्या सचिव मनीषा म्हैसकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली. समितीच्या दोन बैठकीही झाल्या. मात्र यावर तोडगा निघाला नाही. नागपूर सुधार प्रन्यास विकास संस्था म्हणून काम करीत असल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. यामुळे नागरिकांमध्ये रोष आहे. यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न सरकारकडून होत आहे. यासाठी आता नागपूर सुधार प्रन्यासकडील सर्व ले-आऊट महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यात येणार आहे. पालकमंत्री बावनकुळे यांनी सांगितले की, नागपूर सुधार प्रन्यासकडील काही योजना एनएमआरडीएकडे वर्ग करण्यात आल्या आहेत. नागपूर सुधार प्रन्यासकडे असलेले सर्व विकसित आणि अविकसित ले-आऊट महानगरपालिकेकडे हस्तांतरित होणार आहे. खुल्या जागेचा वादही निकाली निघाला आहे. या सर्व जागा महानगरपालिकेकडे वर्ग होणार आहे.एनएमआरडीएच्या पदभरतीसाठी हवी यूडीची मंजुरीमेट्रो रिजनमधील सर्व कार्यभार एनएमआरडीएकडे वर्ग करण्यात आले आहे. सुधार प्रन्यासच्या माध्यमातून होत असलेला ताजबाग आणि दीक्षाभूमी येथील डॉ. बाबासाहेब कन्व्हेंशनल सेंटरचे कामही एनएमआरडीएला वर्ग करण्यात आले आहे. एनएमआरडीएकरता ३५९ पदांची मान्यता देण्यात आली आहे. याच्या पद भरतीसाठी नगर विकास (यूडी) विभागाची मंजुरी बाकी आहे. ती मिळताच भरती करण्यात येणार आहे. सुधार प्रन्यासचा कार्यभार एनएमआरडीएकडे देण्यात आल्याने कर्मचारी प्रतिनियुक्तीवर घेण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिली.
नागपूर शहरात केवळ मनपाच ‘प्लॅनिंग अॅथोरिटी’ : पालकमंत्री बावनकुळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 12:38 AM
नागरिकांना मूलभूत सोई पुरविण्यात कोणतीही अडचण होता कामा नये, यासाठी एकच विकास संस्था ठेवण्यात येणार आहे. ती म्हणजे महापालिका. महापलिका हीच शहरातील एकमेव प्लॅनिंग अॅथोरिटी राहील. नागपूर सुधार प्रन्यासकडे असलेल्या सर्व जागा आणि ले-आऊट महानगरपालिकेकडे हस्तांतरित होणार आहे, लवकरत ही कार्यवाही पूर्ण होणार असल्याची माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
ठळक मुद्दे सुधार प्रन्यासच्या सर्व जागा व ले-आऊट मनपाकडे हस्तांतरित