लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) नागपूर शहरचे प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून कार्यरत असलेले बजरंग खरमाटे यांच्याकडून नागपूर शहर आरटीओचा कार्यभार काढून टाकल्याने खळबळ उडाली. नागपूर ग्रामीण आरटीओचे प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीपाद वाडेकर यांच्याकडे शहरची जबाबदारी देण्यात आली आहे.शहर आरटीओ कार्यालयातून प्रादेशिक परिवहन अधिकारी शरद जिचकार ३१ जुलै रोजी निवृत्त झाले. वर्धा कार्यालयाचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी खरमाटे यांना प्रभारी म्हणून शहर आरटीओची जबाबदारी देण्यात आली. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. प्राप्त माहितीनुसार, खरमाटे यांच्यावर आरोप असलेल्या जुन्या एका प्रकरणाची चौकशी सुरू आहे. शिवाय, ५ सप्टेंबरच्या शासन परिपत्रकानुसार, एखाद्या कार्यालयात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी असताना दुसऱ्या कार्यालयातील समान पदाच्या अधिकाºयाला प्रादेशिक परिवहन अधिकारी पदाची जबाबदारी देता येत नसल्याचे स्पष्ट केले आहे. या आधारावर खरमाटे यांच्याकडून नागपूर आरटीओची जबाबदारी काढून घेण्यात आल्याचे सांगण्यात येते. परंतु यावर कुणी अधिकारी बोलायला तयार नाहीत. मात्र शुक्रवारी खरमाटे यांच्याकडून आरटीओचा पदभार काढून टाकण्यात आल्याचे पत्र मिळताच उलटसुलट चर्चेला पेव फुटले. सध्या शहर आरटीओ कार्यालयाची जबाबदारी ग्रामीण कार्यालयाचे वाडेकर यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.सहा महिन्यांपासून आरटीओचे पद रिक्तशरद जिचकार हे निवृत्त झाल्यापासून शहर आरटीओचे पद गेल्या पाच महिन्यांपासून रिक्त आहे. प्रभारी म्हणून अधिकारी कामकाज पाहत असले तरी त्यांच्याकडे दोन कार्यालयाची जबाबदारी राहत असल्याने कार्यालयाचा विकास खुंटला आहे. विशेष म्हणजे, परिवहन विभागातील अनेक अधिकारी कालबद्ध बढतीसाठी प्रतीक्षेत आहे, परंतु त्याकडे कुणाचेच लक्ष नाही.
नागपूर शहर आरटीओ : खरमाटे यांच्याकडून काढला पदभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2018 11:18 PM
प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) नागपूर शहरचे प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून कार्यरत असलेले बजरंग खरमाटे यांच्याकडून नागपूर शहर आरटीओचा कार्यभार काढून टाकल्याने खळबळ उडाली. नागपूर ग्रामीण आरटीओचे प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीपाद वाडेकर यांच्याकडे शहरची जबाबदारी देण्यात आली आहे.
ठळक मुद्देवाडेकर यांच्याकडे जबाबदारी