लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर लोकसभा क्षेत्रातील युवक काँग्रेसच्या संघटनात्मक निवडणुकीत विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. मतदानाच्या वेळी झालेल्या गोंधळाचा गुरुवारी होणाऱ्या मतमोजणीवरही परिणाम झाला. यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांनी ऐनवेळी मतमोजणी शुक्रवारपर्यंत स्थगित ठेवली. दरम्यान मतमोजणी स्थगित झाल्याबाबत माहिती नसल्याने देवडिया काँग्रेस भवन येथे युवक काँग्रेसचे कार्यकर्ते सायंकाळपर्यंत मतमोजणी सुरू होण्याची प्रतीक्षेत थांबले होते.९ सप्टेंबरला युवक काँग्रेसच्या संघटनात्मक निवडणुकीच्या प्रक्रियेंतर्गत विधानसभा क्षेत्रनिहाय मतदान सुरू झाले. निवडणूक प्रक्रियेतून प्रदेश अध्यक्ष, प्रदेश महामंत्री, शहराध्यक्ष, महामंत्री, विधानसभा अध्यक्षपदासाठी मतदान घेण्यात आले. मतदानाच्या शेवटच्या दिवशी बुधवारी पश्चिम व दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा क्षेत्रासाठी मतदान झाले. नागपूर शहरात एकूण १२,५०० मतदारांपैकी ५,०२३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. गुरुवारी मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर शहराध्यक्ष पदाचे उमेदवारांनी एहबाब कम्युनिटी हॉल येथे बोगस मतदान झाल्याचा आरोप करून गोंधळ घातला. कार्यक र्त्यांनी गोंधळ घालून धक्का-बुक्की केली.गुरुवारी सकाळी १० वाजता देवडिया काँग्रेस भवन येथे शहराध्यक्ष, महामंत्री व विधानसभा अध्यक्षपदासाठी मतमोजणीला सुरुवात होणार होती. परंतु सायंकाळपर्यंत कोणताही निर्णय होऊ शकला नाही. मतमोजणी शुक्रवारी करण्याचा निर्णय घेण्यात आला. मतमोजणीबाबत परिस्थिती स्पष्ट नसल्याने कार्यकर्त्यांत नाराजी दिसून आली.बोगस मतदानाचा आरोपमतदान अधिकाऱ्यांनी गुरुवारी शहराध्यक्ष पदाचे उमेदवार धीरज पांडे व इर्शाद शेख यांची बाजू जाणून घेतली. दोघांनीही बोगस मतदान झाल्याचा आरोप केला. पांडे म्हणाले, युवक काँग्रेसच्या राजकारणात सक्रिय आहे. काँग्रेस विचाराशी प्रामाणिक आहे. मी कुणालाही मारहाण के ली नाही. फक्त बोगस मतदान झाल्याचा आरोप करीत होते. त्याचवेळी कार्यकर्त्यांनी धक्का दिल्याने त्यांचे संतुलन बिघडले व ते निवडणूक अधिकाऱ्यांच्या अंगावर पडले. त्यांनी बोगस मतदानाची चौकशी करण्याची मागणी केली.कारवाईचे संकेतयुवक काँग्रेसच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे गोंधळ घालणाऱ्या कार्यकर्त्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. निवडणूक अधिकाऱ्यांनी यासंदर्भात पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडे अभिप्राय मागितला आहे.