शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
2
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
3
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
4
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
5
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
6
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
7
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
8
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
9
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
10
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
11
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
12
"महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता मत विकणार नाही’’, जयंत पाटील यांचा भाजपाला टोला   
13
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'अखेर भ्रष्टयुतीचा कारभार उघडा पडला, विनोद तावडेंवर कारवाई झाली पाहिजे'; नाना पटोलेंची मागणी
15
Vinod Tawde: बविआने पैसे वाटताना पकडले? विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया...
16
आईवरील उपचार थांबवून त्यांनी...; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर मोठा आरोप
17
घसरत्या बाजारात कुठे गुंतवणूक कराताहेत Mutual Fund हाऊस, कोणते आहेत ३ महिन्यांतील टॉप शेअर्स?
18
एक विवाह ऐसा भी! ११ रोपं आणि १ रुपया घेऊन नवरदेवाने बांधली लग्नगाठ; म्हणाला...
19
गौरी महालक्ष्मी योग: ७ राशींना भरपूर लाभ, शेअर बाजारातून नफा; उत्पन्न वाढेल, सुख-वैभव काळ!
20
अमेरिकेत संक्रमित गाजर खाल्ल्याने एका व्यक्तीचा मृत्यू, अनेक जण आजारी; १८ राज्यांमधून परत मागवले

नागरी सेवा परीक्षेची मुलाखत लवकरच नागपुरात :प्रमोद लाखे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2019 1:01 AM

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा (युपीएससी) परीक्षांमध्ये मराठी टक्का वाढावा, या उद्देशाने लवकरच नागपूर येथे अंदाजे १४ व १५ जानेवारीदरम्यान अभिरुप मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती भारतीय प्रशासकीय सेवापूर्व प्रशिक्षण केंद्राचे (प्री-आयएएस कोचिंग सेंटर) संचालक डॉ. प्रमोद लाखे यांनी दिली. जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने आयोजित ‘माध्यम संवाद’ कार्यक्रमात ते पत्रकारांशी बोलत होते.

ठळक मुद्दे यंदापासून प्री-आयएएस कोचिंग सेंटरमध्ये नवा उपक्रम सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा (युपीएससी) परीक्षांमध्ये मराठी टक्का वाढावा, या उद्देशाने लवकरच नागपूर येथे अंदाजे १४ व १५ जानेवारीदरम्यान अभिरुप मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती भारतीय प्रशासकीय सेवापूर्व प्रशिक्षण केंद्राचे (प्री-आयएएस कोचिंग सेंटर) संचालक डॉ. प्रमोद लाखे यांनी दिली. जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने आयोजित ‘माध्यम संवाद’ कार्यक्रमात ते पत्रकारांशी बोलत होते.युपीएससीची मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेला आणि महाराष्ट्राचा रहिवासी असलेल्या कोणताही उमेदवार या अभिरुप मुलाखतीला उपस्थित राहून मार्गदर्शन मिळवू शकेल. त्यासाठी तो प्री-आयएएस कोचिंग सेंटरचा उमेदवार नसला तरी चालेल, असे सांगून संचालक लाखे यांनी केंद्रीय नागरी परीक्षेतून मराठी टक्का वाढावा, हा मुख्य हेतू या अभिरुप मुलाखती घेण्यामागे असल्याचे स्पष्ट केले. राज्यात मुंबई, नागपूर, औरंगाबाद, अमरावती, कोल्हापूर आणि नाशिक असे सहा प्रशिक्षण केंद्र असून, एकट्या नागपुरातील केंद्रामधून आजपर्यंत १०१ उमेदवार शासनसेवेत दाखल झाले असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. त्यामुळे या केंद्रामधून परीक्षा पूर्व प्रशिक्षण घेणाऱ्या उमेदवारांना ११ महिन्यांच्या कालावधीमध्ये विविध विषयतज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभते. तसेच त्यांना या कालावधीत पूर्वीच्या २ हजार रुपयांवरुन ४ हजार रुपये विद्यावेतनही दिले जाते, असेही डॉ. लाखे यांनी सांगितले.सन २०१५ पर्यंत या केंद्रात केवळ ६० उमेदवारांना परीक्षा पूर्व प्रशिक्षण देण्याची मर्यादा होती. मात्र, २०१५ नंतर १२० उमेदवारांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. त्यात सन २०११ पासून १० अल्पसंख्यांक, व सन २०१६ पासून १० बार्टी (अनुसूचित जाती) असे एकूण १२० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. आजपर्यंत या केंद्रातून १३ आयएएस, ११ आयपीएस, २ आयएफएस, २ भारतीय वनसेवा आणि इतर अनुषंगिक सेवांमध्ये ७३ अधिकारी सेवा बजावत असल्याचे लाखे यावेळी म्हणाले.राष्ट्रीय स्तरावर भारतीय प्रशासकीय सेवा व तत्सम विविध स्पर्धा परीक्षांसाठी प्रयत्न करणाºया नागपुरातील उमेदवारांचे प्रशासनातील प्रतिनिधित्व वाढावे. त्यांच्यातील वैयक्तिक त्रुटी दूर करणे, सामाजिक विषयांना अद्ययावत करणे, तथा युपीएससी उमेदवारांना गुणात्मक प्रशिक्षण देण्याच्या दृष्टीने या संस्थेत सत्र २०१८ च्या तुकडीपासून संस्थेतर्फे अभिरुप मुलाखत घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. संस्थेतून २०१८ ची मुख्य परीक्षा उतीर्ण झालेले विद्यार्थी व संस्थेशी संबंधित नसणारे परंतु, नागरी सेवा मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेले बाहेरील विद्यार्थीही यात सहभागी होऊ शकतात. या अभिरुप मुलाखती जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात घेण्यात येईल. राज्यातील अनेक उमेदवार मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर मुलाखतीची तयारी करण्यासाठी पुणे, मुंबई आणि दिल्ली या शहरांमध्ये जात असत. त्यामध्येही तेथील कोचिंग क्लासेसचे शुल्क वेगवेगळे, शिवाय तिथे राहण्याचा खर्च सर्वसामान्य मुलांला परवडेलच असे नाही. त्यामुळे मराठी उमेदवारांची ही अडचण दूर करुन त्यांना मुलाखतीमध्ये विचारण्यात येणारे प्रश्न अभिरुप मुलाखती घेऊन सोडवता येणार आहेत, त्यातून मराठी उमेदवारांचे युपीएससीमध्ये उत्तीर्ण होण्याचे प्रमाण नक्कीच वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :upscकेंद्रीय लोकसेवा आयोगnagpurनागपूर