शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
4
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 
5
२५०० रुपयांच्या SIP नं बनले १ कोटी रुपये; SBI च्या 'या' म्युच्युअल फंडानं दिले छप्परफाड रिटर्न
6
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
7
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
8
मृणाल दुसानिसने पतीसोबत ठाण्यात सुरु केलं स्वतःचं रेस्टॉरंट, मराठी कलाकारांनी लावली उपस्थिती
9
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
10
Success Story : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
11
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
12
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
13
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
14
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
16
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
17
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
18
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
19
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
20
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?

विदर्भात नागपूर सर्वाधिक थंड : पारा घटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2019 11:28 PM

सोमवारी संपूर्ण विदर्भात नागपूर शहर सर्वाधिक थंड राहिले. येथे रात्रीच्या तापमानात मागील २४ तासांमध्ये १.४ अंश सेल्सिअसवरून घट होऊन ते १५.८ सेल्सिअसपर्यंत खाली घसरले.

ठळक मुद्देरात्रीचे तापमान पोहचले १५.८ अंशावर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मागील आठवड्यातील ढगाळी वातावरण दूर होऊन आकाश स्वच्छ झाले आहे, सोबतच शहरातील तापमानाच्या पाऱ्यातही घट व्हायला सुरूवात झाली आहे. सोमवारी संपूर्ण विदर्भात नागपूर शहर सर्वाधिक थंड राहिले. येथे रात्रीच्या तापमानात मागील २४ तासांमध्ये १.४ अंश सेल्सिअसवरून घट होऊन ते १५.८ सेल्सिअसपर्यंत खाली घसरले.हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर महिन्यात नागपुरात तापमान दिवसा अधिक आणि रात्री कमी असते. रात्रीच्या तापमानापेक्षा दिवसाचे तापमान जवळपास दुप्पट असते. सकाळचे उन्ह कडक आणि कोवळे असते. सध्या आकाश नीरभ्र आहे. यामुळे पाऱ्यामध्ये घसरण होत आहे. नोव्हेंबरचा दुसऱ्या आठवड्यात तापमानात पुन्हा घट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. उत्तर भारतामध्ये सुरू असलेल्या बर्फवृष्टीमुळे मध्य भारतामधील हवेत आर्द्रता निर्माण होण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. पुढील दोन दिवसात हा बदल जाणवलेला अनुभवता येणार आहे.नागपुरात सोमवारी किमान तापमान ३१.५ अंश सेल्सिअस असे सामान्य होते. दिवसा तापमान ३० सेल्सिअसच्या खाली आल्यावर हलक्या थंडीचा अनुभव सकाळी येण्याची शक्यता आहे. सध्या रात्री पारा सामान्यापेक्षा एका अंशाने खाली १५.८ पर्यंत घसरला आहे. त्यामुळे रात्रीच्या वातावरणात गारठा जाणवायला लागला आहे.विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोली (२१ अंश सेल्सिअस) वगळले तर अन्य जिल्ह्यात पारा २० अंशाच्या खाली उतरला आहे. अन्य जिल्ह्यांमध्ये दिवसाचे तापमान सामान्य स्तराच्या जवळपास आहे. अकोलामध्ये किमान तापमान १८.२, अमरावतीमध्ये १९.०, बुलडाणा १७, ब्रह्मपुरी १९.१, गोंदिया १६.८, वर्धा १८.६, वाशिम १९.२ तर यवतमाळमध्ये १७.४ अंश सेल्सिअस नोंद झाली आहे.कडक थंडी पडणारविदर्भात पाऊस ज्या प्रमाणे एक महिना विलंबाने आला, नंतर मात्र बराच काळ थांबून थांबून मुक्कामाला राहिला तशीच थंडीही थोडी विलंबाने मात्र बरीच अधिक पडण्याची शक्यता आहे. डिसेंबर आणि जानेवारी हे दोन्ही महिने पूर्णत: थंडीचेच असतील, असाही अंदाज आहे.

टॅग्स :weatherहवामानnagpurनागपूर