लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरात ३०० पेक्षा अधिक इमारतींच्या छतावर अवैध हॉटेल, बार आणि हुक्का पार्लर सुरू आहेत. अपघातांना निमंत्रण देणाऱ्या या हॉटेल, बार आणि हुक्का पार्लरबाबत पोलीस, मनपा आणि अबकारी विभाग मौन साधून आहे. मुंबईतील कमला मिल अग्निकांडाच्या घटनेनंतर मुंबईच्या मनपा आयुक्तांनी इमारतींच्या छतांवर अवैध पद्धतीने सुरू असलेल्या हॉटेल व बार विरुद्ध कारवाई करण्याचे आदेश दिले होते. या घटनेनंतर राज्यातील सर्व महानगरपालिकांनाही जाग आली होती. त्यांनी अवैध हॉटेल आणि बार विरुद्ध कारवाई करण्याचा संकल्प केला होता. याअंतर्गत शहरातील इतर शासकीय विभागसुद्धा सक्रिय होतील, अशी शक्यता होती. परंतु कमला मिल अग्निकांड आणि आता रुफ नाईन बार व हुक्का पार्लरवर झालेल्या कारवाईनंतरही कुठलीही हालचाल सुरू झाली नाही. परिणामी इमारतींच्या छतांवर अवैध बार, हॉटेल आणि हुक्का पार्लर सर्रासपणे सुरू आहे.शहरात सदर, रामदासपेठ, धरमपेठ, अंबाझरी, बजाजनगर, गांधीसागर तलाव परिसर, कामठी मार्ग, मानेवाडा रिंगरोड, अमरावती महामार्ग, एमआयडीसी आणि हिंगणा परिसरात जवळपास १०० ठिकाणी छतांवर अवैध बार, हॉटेल आणि हुक्का पार्लर सुरू आहेत. या ठिकाणी आग लागण्याचा सर्वाधिक धोका आहे. इमारतीच्या छतावर स्वयंपाकघर आणि ग्राहकांना बसण्याची व्यवस्था करण्यात येते. ताडपत्री किंवा प्लास्टिकचे छत तयार करून हॉटेलचे रूप देण्यात आले आहे. किचन आणि ग्राहकांच्या बसण्याची व्यवस्था एकाच ठिकाणी असल्याने तिथे कमला मिलच्या धर्तीवर आग लागण्याचा धोका नाकारता येत नाही. यापार्श्वभूमीवर सर्वप्रथम अग्निशमन विभागामार्फतच अशा हॉटेल व बारविरुद्ध कारवाई व्हायला हवी. परंतु या दिशेने अजूनपर्यंत कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही. महाराष्ट्र अग्निशमन सुरक्षाअधिनियमांतर्गत अवैध हॉटेल किंवा बार तातडीने ‘सील’सुद्धा करता येऊ शकतात. शहरात असे अनेक हॉटेल आणि बार आहेत ज्यांनी अवैधपणे इमारतींच्या छतावर कब्जा करून ‘टेरेस रेस्ट्रो’ उघडले आहेत. छतावरच भोजन आणि दारू उपलब्ध केली जाते. छतावर किचनसुद्धा बनविण्यात आले आहे. असे हॉटेल आणि बारची संख्या खूप आहे. संबंधित हॉटेल व बारकडे अग्निशमन विभागाचे नाहरकत प्रमाणपत्रसुद्धा असते. यात किचन आणि सुरक्षेच्या मानकाचे कठोरपणे पालन करण्याचे निर्देश दिलेले असतात.छतावर रेस्टॉरंट चालवण्यात येत असल्याने एनओसीच्या नियमांचेही उल्लंघन होते. परंतु अजूनपर्यंत कुठल्याही हॉटेल किंवा बारच्या विरुद्ध अशी कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही. अग्निशमन विभागाच्या पाहणीत मात्र अनेक हॉटेल व बार छतांवर सुरू असल्याचे आढळून आले आहे. सीताबर्डी, सदर, बजाजनगर, अंबाझरी, वाडी, एमआयडीसी, हिंगणा पोलीस ठाणे परिसरात टेरेस रेस्ट्रो अॅण्ड बारची संख्या अधिक आहे. नागरिकांच्या जीवाशी खेळ करणारे हॉटेल किंवा बार चालकांविरुद्ध कारवाई करण्यासाठी मनपा, पोलीस आणि अबकारी विभागाकडे अनेक नियम व तरतुदी आहेत. अशा हॉटेल व बारचे वीज व पाणीसुद्धा बंद केले जाऊ शकते. पोलीस स्वयं मनपा प्रशासनाला ते बंद करण्याची विनंती करू शकतात. परंतु ‘मासिक कमाई’मुळे कुणीही याला गांभीर्याने घेत नाही.सूत्रानुसार अग्निशमन विभागाच्या तपासणीत नियमांचे उल्लंघन करून हॉटेल किंवा बार चालवले जात असल्याचे उघडकीस आले आहे. परंतु अग्निशमन विभागाने स्वत: कारवाई करण्याऐवजी संबंधित मनपा झोन कार्यालयाला कारवाई करण्याची शिफारस केली आहे. संबंधित मनपा झोनचे अधिकारीसुद्धा काही कारणास्तव या शिफारशीवर कारवाई करताना दिसून येत नाही. त्यांचे म्हणणे आहे की, ‘एनओसीची कमाई’ अग्निशमनच्या खिशात जाते. तेव्हा त्यांनीच यासंबंधात कारवाई करायला हवी.बँक्वेट हॉलला आश्रयगांधीसागर तलावाजवळ असलेल्या चर्चित बँक्वेट हॉलच्या छतावर किचन सुरू आहे. सूत्रानुसार कुठल्याही क्षणी येथे अपघात होऊ शकतो. यादृष्टीने अग्निशमन विभागाने बँक्वेंट हॉलच्या संचालकाला नोटीस जारी केली आहे. यानंतरही येथे किचन सुरू आहे. या बँक्वेट हॉलमध्ये नेहमीच नेते आणि प्रभावशाली लोकांचे विवाह समारंभ आयोजित केले जातात. त्यामुळे कुणीही कारवाई करण्याची हिंमत करीत नाही आहे. बँक्वेट हॉल रहिवासी परिसरात आहे. अशापरिस्थितीत एखादी घटना घडल्यास जबाबदार कोण राहील? या विचाराने अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांना घाम फुटतो. गांधीसागर रोडवरील एक सावजी हॉटेलसुद्धा ‘मेहेरबानी’च्या मोबदल्यात मोठी रक्कम मोजतो, असे सांगितले जाते.
नागपुरात आजही छतांवर सुरू आहे मृत्यूचा खेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2018 11:40 PM
शहरात ३०० पेक्षा अधिक इमारतींच्या छतावर अवैध हॉटेल, बार आणि हुक्का पार्लर सुरू आहेत. अपघातांना निमंत्रण देणाऱ्या या हॉटेल, बार आणि हुक्का पार्लरबाबत पोलीस, मनपा आणि अबकारी विभाग मौन साधून आहे.
ठळक मुद्देकमला मिल अग्निकांड प्रकरणानंतरही कारवाई नाही