लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : क्विकर डॉट कॉमवर नोकरीचा आॅनलाईन अर्ज भरणाऱ्या महिलेला नोकरी लागल्याचे आमिष दाखवून सायबर टोळीने २१ हजार ५०० रुपये हडपले. ३ मार्च ते १६ मार्चदरम्यान झालेल्या या फसवणुकीची तक्रार सुकेशिनी किशोर कोडापे यांनी नोंदविल्यानंतर बुधवारी यशोधरानगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.सुकेशिनी यांनी नोकरीसाठी आॅनलाईन आवेदन केल्याचे हेरून ३ मार्च ते १६ मार्च २०१८ दरम्यान ९२०५९०७७८३ मोबाईल क्रमांकावरून ईशाली, ७५५७ ३९६७ ०५ क्रमांकाच्या मोबाईलवरून सिद्धार्थ तसेच ७५३३१४८८३ क्रमांकाचा मोबाईलधारक रोहित मेहरा या तिघांनी वेळोवेळी कॉल करून तुम्हाला एचडीएफसी बँकेत नोकरी मिळाली आहे, असे सांगितले. नियुक्तीपूर्वीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येणारा खर्च म्हणून त्यांना आधी स्टेट बँकेच्या खात्यात १५०० रुपये, नंतर कॅनरा बँकेच्या खात्यात ५,५०० रुपये आणि त्यानंतर पुन्हा स्टेट बँकेच्या खात्यात १४,५०० रुपये भरण्यास बाध्य केले. त्यानंतरही आरोपी वेगवेगळ्या नावाखाली बँकेत रक्कम जमा करायला लावत असल्याने कोडापे यांना संशय आला. त्यांनी रक्कम भरण्यास नकार दिल्याने आरोपींनी संपर्क बंद केला. त्यांनी फसवणूक केल्याचे लक्षात आल्याने कोडापे यांनी यशोधरानगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध घेतला जात आहे.
नागपुरात सराईत सायबर टोळीने गंडविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 11:34 PM
क्विकर डॉट कॉमवर नोकरीचा आॅनलाईन अर्ज भरणाऱ्या महिलेला नोकरी लागल्याचे आमिष दाखवून सायबर टोळीने २१ हजार ५०० रुपये हडपले. ३ मार्च ते १६ मार्चदरम्यान झालेल्या या फसवणुकीची तक्रार सुकेशिनी किशोर कोडापे यांनी नोंदविल्यानंतर बुधवारी यशोधरानगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
ठळक मुद्देमहिलेला नोकरीचे आमिष : २१ हजार हडपले