लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कळमन्यातील भांडेवाडी परिसरात १९ जुलैला रात्री ८.३० च्या सुमारास झालेल्या सिलिंडर स्फोटामुळे दगावलेल्यांची संख्या तीन झाली आहे. दोन जण गंभीर जखमी आहे. पारडीजवळच्या भांडेवाडी परिसरात स्वागतनगर आहे. तेथील रहिवासी दत्तू लक्ष्मण गुरकुंडे (वय ७०) यांच्याकडे १९ जुलैला रात्री ७ च्या सुमारास सिलिंडरचा स्फोट झाला होता. तेथे पेट्रोलने भरलेल्या मोठ्या डबक्या होत्या. त्यामुळे आगीचा भडका उडाला आणि त्यात भाजून गुरकुंडे, त्यांचा मुलगा प्रकाश (वय ३५), त्यांच्याकडे वाहनचालक म्हणून काम करणारा कुलदीप सेलोटे (वय ३०, रा. भिवापूर), भाडेकरू हेमराज विठोबा पडोळे (वय ३०), रोशन सदाशिव उके (वय २४) आणि धनराज नामक व्यक्ती गंभीर जखमी झाले होते. सर्व जखमींना मेयोत नेण्यात आले होते. तेथे डॉक्टरांनी दत्तू गुरकुंडे यांना मृत घोषित केले. काही तासानंतर कुलदीप सेलोटचाही मृत्यू झाला होता. जखमींपैकी प्रकाश गुरकुंडे, हेमराज पडोळे आणि रोशन उकेंवर उपचार सुरू असताना सोमवारी मध्यरात्रीनंतर हेमराज पडोळे यांनाही डॉक्टरांनी मृत घोषित केले. दरम्यान, राहुल दामोदर बोरीकर (वय २४) यांनी दिलेल्या सूचनेवरून कळमना पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे. जखमी प्रकाश आणि रोशनची प्रकृती गंभीर आहे. पुढील तपास सुरू आहे.
नागपूर सिलिंडर स्फोटातील मृत्युसंख्या तीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 9:36 PM
कळमन्यातील भांडेवाडी परिसरात १९ जुलैला रात्री ८.३० च्या सुमारास झालेल्या सिलिंडर स्फोटामुळे दगावलेल्यांची संख्या तीन झाली आहे.
ठळक मुद्देकारण गुलदस्त्यात : कळमना पोलिसांत गुन्हा दाखल