शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
2
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
3
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
4
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
5
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
6
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
7
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
8
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
9
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
10
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
11
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
12
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
13
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
14
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
15
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
16
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
17
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
18
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
19
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
20
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत

तरुणाईच्या ‘ब्रेन वॉश’साठी ‘डार्क वेब’चा वापर, साडेनऊ हजारांहून अधिक ‘यूआरएल’वर हंटर

By योगेश पांडे | Updated: December 19, 2024 23:38 IST

Nagpur News: मागील काही काळापासून देशातील अंतर्गत सुरक्षेला हानी पोहोचवून कायदा व सुव्यवस्थेला धक्का लावण्यासाठी जहाल विचारसरणीच्या विविध संघटनांकडून प्रयत्न सुरू आहेत.

 - योगेश पांडे नागपूर - मागील काही काळापासून देशातील अंतर्गत सुरक्षेला हानी पोहोचवून कायदा व सुव्यवस्थेला धक्का लावण्यासाठी जहाल विचारसरणीच्या विविध संघटनांकडून प्रयत्न सुरू आहेत. तरुणाईमध्ये जहाल विचारांचा प्रचार प्रसार करून त्यांचा ‘ब्रेन वॉश’ करण्यासाठी या संघटनांकडून तंत्रज्ञानासोबतच ‘डार्क वेब’चा वापर करण्यात येत असल्याचे सुरक्षायंत्रणांच्या चौकशीतून समोर आले आहे. ही बाब सुरक्षायंत्रणांसाठी धोक्याची घंटा असून अशा विचारांचा प्रचार-प्रसार करणाऱ्या साडेनऊ हजारांहून अधिक ‘यूआरएल’ला बंद करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

देशातील व देशाबाहेरील विविध दहशतवादी तसेच कट्टरवादी संघटनांकडून जहाल विचार तरुणाईपर्यंत पोहोचवून त्यांना स्वत:कडे ओढून घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. विविध घटनांमध्ये अटक झालेल्या दहशतवाद्यांच्या चौकशीतूनदेखील ही बाब स्पष्ट झाली आहे. तरुणांची दिशाभूल करत ऑनलाइन कंटेंट त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यावर भर देण्यात येत आहे. यासाठी त्यांच्याकडून इंटरनेटची सर्वसाधारण संकेतस्थळे, व्हॉट्सॲप, फेसबुक यांचा उपयोग तर होतच आहे. याशिवाय ‘डार्क वेब’चा वापर करण्यावर जास्त भर देण्यात येत आहे. यामुळे या संघटनांच्या गतिविधी सहजपणे सुरक्षायंत्रणांच्या रडारवर येत नाहीत. या संघटनांकडून समान विचारांच्या लोकांसोबत संवादासाठी ‘वायबर’, ‘सिग्नल’, ‘टेलिग्राम’चादेखील उपयोग करण्यात येत आहे. यासाठी बरेचदा ‘कोडेड’ भाषेचादेखील वापर होतो. सुरक्षायंत्रणांनी कट्टर व जहाल विचारांचा प्रचार प्रसार करत देशासाठी धोका निर्माण करणाऱ्या ९ हजार ८४५ ‘यूआरएल’ला ब्लॉक करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

एनआयएकडून ६७ प्रकरणांची चौकशीगृहविभागातील अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, ऑनलाइन ‘रॅडिकलायझेशन’संदर्भात विविध राज्यांत शेकडो गुन्हे दाखल झाले आहेत. यातील ६७ प्रकरणांची ‘एनआयए’कडून चौकशी करण्यात येत आहे. एनआयएच्या पथकांनी आतापर्यंत ३२५ आरोपींना अटकदेखील केली आहे.

साडेसहाशेहून अधिक ऑनलाइन बेटिंग ॲपविरोधात कारवाईकाही संघटनांकडून ऑनलाइन बेटिंग-गेमिंग ॲप व संकेतस्थळांच्या माध्यमातून फंड रेझिंग करण्यात येत आहे. यातील अनेक मास्टरमाइंड्स हे बाहेरील देशात राहून सूत्रे संचालित करत आहेत. या ॲप्सच्या नादाला लागून भारतीयांना शेकडो कोटींचा फटका बसला असून यात तरुणांचे प्रमाण अधिक आहे. २०२२ ते २०२४ या कालावधीत अशा प्रकारच्या ६८२ ॲप्स व संकेतस्थळांना बंद करण्यात आले असून काही ॲप्सला बंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर