- गणेश हूड नागपूर - जिल्हा परिषदेच्या आवारातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बोर्डिंगचे विद्दृपीकरण केल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षातर्फे सोमवारी जिल्हा परिषद कार्यालयापुढे धरणे आंदोलन सुरू आहे. भाजपचे नागपूर ग्रामीणचे अध्यक्ष माजी आमदार सुधाकर कोहळे, शहर अध्यक्ष बंटी कुकडे, आमदार समीर मेघे , प्रवीण दटके, यांच्यासह भाजपचे शहर व ग्रामीण भागातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.जिल्हा परिषद अर्थसंकल्पाच्या पुस्तकावर कोर्टाने दोषी ठरवलेल्या माजी आमदार सुनील केदारांचा फोटो छापन्याचाही यावेळी निषेध करण्यात आला. घटनात्मक पदावर असलेल्या नेत्याच्या प्रतिमेला काळे फासणे हा गुन्हा असताना काँग्रेसकडून त्याचे समर्थन होत आहे, हे निषेधार्ह आहे. याचा निषेध करण्यासाठी नागपूर जिल्हा परिषद कार्यालयाच्या मुख्य प्रवेश व्दाराजवळ निषेध आंदोलन केले जात आहे.प्रमुख मागण्या - देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या होर्डींगला जाणीवपूर्वक काळे फासणाऱ्या काँग्रेसी कार्यकर्त्यांना त्वरीत अटक करा.- कोर्टाने दोषी ठरवलेल्या माजी आमदाराची प्रतिमा जिल्हा परिषद कार्यालयातून त्वरीत हटवण्यात यावी.
Nagpur: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या होर्डिगचे विद्रुपीकरण, संतप्त भाजपचे जिल्हा परिषदेपुढे धरणे
By गणेश हुड | Published: February 05, 2024 11:59 AM