लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जनसंवाद या उपक्रमाच्या माध्यमातून प्रत्येक गावात जाऊन सामान्य जनतेला येणाऱ्या अडचणी तसेच प्रशासनासंदर्भात असलेले प्रश्न सोडविण्यासाठी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुरू केलेल्या संवाद यात्रेला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मौदा तालुक्यातील झुल्लर, माथनी, पावडदौना, मारोडी तसेच चिरवा आदी गावांना भेट देऊन ग्रामस्थांची थेट संवाद साधला. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निशाताई सावरकर, टेकचंद सावरकर, नरेश मोटघरे आदी उपस्थित होते.ग्रामीण भागात पावसाळा सूरु होण्यापूर्वी आवश्यक उपाय योजना आवश्यक असून खरीप पेरणीसाठी बियाणे, खते तसेच आवश्यक शेती अवजारांची उपलब्धता करून देण्याच्या सूचना करताना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून सामान्य जनतेला थेट लाभ मिळावा. यासाठी अधिकाºयांनी पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही याची खबरदारी घेण्याच्या सूचना यावेळी त्यांनी दिल्या. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जनतेशी थेट संवाद साधून त्यांच्या तक्रारी व अडचणी समजून घेतल्या. प्राप्त झालेल्या तक्रारीवर तात्काळ कारवाई करून ग्रामस्थांना जनसंवाद कार्यक्रमात दिलासा दिला. या तक्रारीमध्ये पांदण रस्त्याचे बांधकाम, आरोग्यविषयक बाबी, महसूल, कृषी, जिल्हा परिषद, महिला व बाल विकास, पंचायत समिती आदी विभागाशी संबंधित तक्रारी व सूचनांचा समावेश होता.
नागपूर पालकमंत्र्यांच्या जनसंवादातून सुटले प्रश्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2018 1:45 AM
जनसंवाद या उपक्रमाच्या माध्यमातून प्रत्येक गावात जाऊन सामान्य जनतेला येणाऱ्या अडचणी तसेच प्रशासनासंदर्भात असलेले प्रश्न सोडविण्यासाठी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुरू केलेल्या संवाद यात्रेला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.
ठळक मुद्देगावकऱ्यांचा प्रतिसाद : शेतकऱ्यांच्या प्रश्नांना प्राधान्य