लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारतीय लोकशाहीत निवडणुकांना महाकुंभासारखे महत्त्व आहे. त्यामुळे मतदार हा केंद्रबिंदू आहे. गेल्या काही वर्षात मतदारांमध्ये जागरुकता वाढली आहे. नव्या मतदारांची नोंदणी करण्याची तसेच मतदान करण्याची संख्याही वाढत चालली आहे. यात महिलाही मागे नाहीत. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत महिला मतदारांच्या संख्येत पुरुषांच्या तुलनेत जास्त वाढ झाली आहे. नागपूर जिल्ह्यातील मतदार संख्या मागील लोकसभेच्या तुलनेत ३ लाख १९ हजार ५६३ नी वाढली असून यात १ लाख ८० हजार ८८६ महिला मतदार आहेत.नागपूर जिल्ह्यात नागपूर शहर आणि रामटेक असे दोन लोकसभा मतदार संघ आहेत. ३१ जानेवारी २०१९ च्या यादीनुसार संपूर्ण नागपूर जिल्ह्याची मतदार संख्या ४० लाख २४ हजार १९७ आहे. यात २० लाख ६६ हजार ११३ पुरुष तर १९ लाख ५७ हजार ९९५ महिला मतदार आहेत. ८९ तृतियपंथी मतदार आहेत. मागील लोकसभा निवडणुकीत जिल्ह्याची लोकसंख्या ३७ लाख ४ हजार ७२३ होती. या लोकसभा निवडणुकीत जवळपास ५५ टक्के मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला होता. मागील निवडणुकीत झालेल्या फेरबदलात तरुण मतदारांचा मोठा वाटा होता. यंदाही मोठ्या प्रमाणात तरुण मतदारांची भर पडली असून त्यातही महिला वर्गाची संख्या जास्त आहे.नागपूर लोकसभानागपूर लोकसभा मतदार संघाची मतदार संख्या २१ लाख २६ हजार ५०८ आहे. यात १० लाख ८० हजार ५७४ पुरुष व १० लाख ४५ हजार ९३४ महिला मतदार आहेत. ६६ तृतियपंथी आहेत. मागील लोकसभा निवडणुकीत १९ लाख ५३ हजार २६६ मतदार संख्या होती. मागील लोकसभेच्या तुलनेत १ लाख ७३ हजार २४२ मतदारांची भर पडली आहे.रामटेक लोकसभारामटेक लोकसभा मतदार संघाची मतदार संख्या १८ लाख ९७ हजार ६०० आहे. यात ९ लाख ८५ हजार ५३९ पुरुष तर ९ लाख १२ हजार ६१ महिला मतदार आहेत. २३ मतदार तृतियपंथी आहेत. मागील निवडणुकीत मतदार संख्या १७ लाख ३१ हजार ४६२ होती. मागील निवडणुकीच्या तुलनेत १ लाख ६६ हजार १३८ मतदारांची भर पडली आहे.
नागपूर जिल्ह्यात पाच वर्षांत पडली ३.१९ लाख मतदारांची भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 10:40 AM
नागपूर जिल्ह्यातील मतदार संख्या मागील लोकसभेच्या तुलनेत ३ लाख १९ हजार ५६३ नी वाढली असून यात १ लाख ८० हजार ८८६ महिला मतदार आहेत.
ठळक मुद्दे१.८० लाख महिला मतदार वाढले१.३८ लाख पुरुष मतदार वाढले