लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्य माध्यमिक बोर्डाच्या बारावीच्या निकाल मंगळवारी जाहीर झाला. नागपूर विभागाचा विचार केला तर विभाग हा राज्यात आठव्या क्रमांकावर राहिला. मागून दुसरा राहिला. त्याचप्रमाणे नागपूर विभागाचा विचार केला तर नागपूर जिल्हा हा विभागात मागून दुसरा राहिला. सहा जिल्ह्याच्या विभागात नागपूर जिल्ह्याने ८९.९३ टक्के गुण घेऊन पाचवा क्रमांक पटकावला.
नागपूर विभागात गोंदिया जिल्ह्याने बाजी मारली. ९५.२४ टक्के गुण घेऊन गोंदिया जिल्हा हा विभागात अव्वल ठरला. त्यानंतर भंडारा जिल्ह्याने ९४.६८ टक्के गुण घेऊन दुसरा, गडचिरोली तिसरा, चंद्रपूर जिल्ह्याने चौथा क्रमांक पटकावला. वर्धा जिल्हा हा विभागात सर्वात शेवटी राहिला.
नागपूर जिल्ह्यातून बारावीच्या परीक्षेला एकूण (रेग्युलर आणि खासगी मिळून) ६६,४३६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ६६,०३६ विद्यार्थी परिक्षेला बसले. यापैकी ५८,६४६ विद्यार्थी पास झाले. यातही मुलींनीच बाजी मारली. ९१.४९ टक्के मुली तर ८६.२३ टक्के मुले उत्तीर्ण झाले.
विभागातील जिल्हानिहाय टक्केवारीगोंदिया - ९५.२४ टक्केभंडारा - ९४.६८ टक्केगडचिरोली - ९४.४२ टक्केचंद्रपूर - ९३.८९ टक्केनागपूर - ८९.९३ टक्केवर्धा - ८९.४० टक्केएकूण - ९२.१२ टक्के